अमरावतीत काँग्रेसचा डंका; शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदे गटाचा धुव्वा

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची (Gram Panchayat Elections) मतमोजणी सुरु आहे.
Congress
Congresssarkarnama

अमरावती : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची (Gram Panchayat Elections) मतमोजणी सुरु आहे. यात अमरावती जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. या निकालांमध्ये काँग्रेस (Congress)भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी व शिंदे गटाचा धुव्वा उडाला आहे. पाच ग्रामपंचायतींपैकी तीन काँग्रेसकडे, एक प्रहारकडे व एक भाजपने जिंकली आहे.

अमरावतीमध्ये उंबरखेड, घोटा, कवाडगव्हाण या तीन ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. यात उंबरखेडच्या सरपंचपदी नितीन कळंबे, घोटाच्या सरपंचपदी रुपाली राऊत, कवाडगव्हाणच्या सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी विजयी झाल्या आहेत. चांदूरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे, तर हरिसाल ग्रामपंचायतमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे विजय दारशिंबे विजयी झाले आहेत.

Congress
धुळ्यात राष्ट्रवादीला धक्का; भाजपचे निर्विवाद यश

राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 608 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर केल्या होत्या. यातील 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 547 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. यासाठी 66.10 टक्के मतदान पार पडले. सोबतच सरपंचपदाच्याही थेट जनतेतून निवडणुका पार पडल्या. मागील काही काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फुट, सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.

Congress
Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यातील तब्बल 32 जागांवर भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोहोर उमटवली आहे. शिवसेना, शिंदेगट व इतर पक्षाला भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी रिमझिम पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ग्रामपंचायत निकालात भाजपने सुरवातीपासून आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर शेवटपर्यंत भाजपने सर्वच जागा जिंकून राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com