अमरावती : नमुना गल्लीमध्ये एका गटाने काढली शस्त्र, तर दुसऱ्या गटाची दगडफेक

काही लोक राजकमल चौकानजीक असलेल्या नमुना गल्लीमध्ये गेले.
अमरावती : नमुना गल्लीमध्ये एका गटाने काढली शस्त्र, तर दुसऱ्या गटाची दगडफेक
Amravati Sarkarnama

नागपूर : त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. विदर्भाच्या अमरावतीमध्ये मुस्लीम संघटनांनी काल काढलेल्या मोर्चादरम्यान तोडफोड आणि दगडफेक झाल्यानंतर प्रचंड तणावाचे वातावरण होते. आजच्या बंदला देखील हिंसक वळण मिळाले. दरम्यान नमुना गल्लीमध्ये एका गटाने शस्त्र बाहेर काढली तर दुसऱ्या गटाने दगडफेक केल्याची माहिती आहे.

राजकमल चौकात पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवल्यानंतर जमाव मिळेल त्या वाटेने पळत गेला. लोक विखुरले गेले. काही लोक राजकमल चौकानजीक असलेल्या नमुना गल्लीमध्ये गेले. तेथे एका गटातील काही युवकांनी शस्त्र काढले, तर दुसऱ्या गटाने त्यांच्यावर दगडफेक केली. यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. ही घटना घडत असताना तेथे पोलिस नव्हते असेही सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर शहराच्या एका गल्लीत अचानक शस्त्र बाहेर निघतात. त्यामुळे राजकमल चौकात घडलेला प्रकार पूर्वनियोजित होता का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या प्रकारानंतर काही वेळात पोलिस येत असल्याचे खबर मिळताच जमाव पुन्हा विखुरला. पण मिनीटा-मिनीटाला अमरावतीमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नवरात्रामध्ये बांगलादेशात दुर्गा मंडपाची मुस्लीम जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद त्रिपुरात उमटले, तर त्रिपुरातील घटनेचे पडसाद आता देश आणि महाराष्ट्रात उमटल्याचे दिसत आहे.

काल अमरावतीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चातील जमावाने दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली होती. पोलिस आयुक्तांनी शांतता बाळगून घरी जाण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांना केले होते. त्यानंतर आजचा बंद घोषित करण्यात आला होता. पण आज बंद दरम्यान पुन्हा हिंसा उफाळून आली. जमावाने राजकमल चौकात दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. दरम्यान अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

काल शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजार आंदोलकांनी मोर्चा काढला, पण हा मोर्चा अचानक आक्रमक झाला आणि त्यांनी दगडफेक आणि वाहनाची तोडफोड सुरू केली. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. अमरावतीत प्रचंड तणावाचे वातावरण होते. पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर रोजी उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील एक मशीद हिंदुत्ववादी संघटनांनी पाडल्याचा आरोप मुस्लिम संघटनांना केला होता. एवढेच नाही तर मशीद परिसरात असलेल्या मुस्लिमांच्या काही दुकानेदेखील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप केला होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in