नारायण राणे, केतकी चितळेंवर तात्काळ कारवाई, शेख हुसेनवर का नाही?

शेख हुसेन यांच्यावर कारवाई करण्याला पोलिस टाळाटाळ का करीत आहेत, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
नारायण राणे, केतकी चितळेंवर तात्काळ कारवाई, शेख हुसेनवर का नाही?
Chandrashekhar Bawankule with Police Commissioner Amiteshkumar.Sarkarnama

नागपूर : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात बोलताच कारवाई केली जाते. केतकी चितळे अजूनही जेलमध्ये आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल (Chief Minister) थप्पड हा शब्द वापरल्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आणि नागपुरात (Nagpur) शेख हुसेन यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल अत्यंत हीन दर्जाचे अपशब्द वापरले. मग त्यांच्यावर कारवाई करण्याला पोलिस टाळाटाळ का करीत आहेत, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLC Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

पोलिसांना तीन दिवस वेळ देऊ, शेख हुसेन यांना अटक झाली नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत ‘थप्पड’ शब्द वापरला, तेव्हा त्यांना अटक केली. मग शेख हुसेन यांनी पंतप्रधान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अटकेची कारवाई का नाही? नागपूर पोलीस सरकारच्या दबावात आहेत का, आदी प्रश्‍न त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारले आहेत. शेख हुसेन यांनी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरले, त्यावेळी त्या आंदोलनात उपस्थित असलेल्या कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांवरही गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या आंदोलनात ऊर्जामंत्री नितीन राऊत, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी पंतप्रधान यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे, या मागणीचे निवेदन आमदार बावनकुळे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईच्या विरोधात कॉंग्रेसने सोमवारी आंदोलन केले होते. तेव्हा मागी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची जीभ घसरली होती. आज पोलिस आयुक्तांना निवेदन देताना आमदार बावनकुळे यांच्यासोबत आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule with Police Commissioner Amiteshkumar.
Video: NMRDA चा भ्रष्टाचार बाहेर काढणार !; चंद्रशेखर बावनकुळे

घडलेल्या घटनेनंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला. तो गुन्हा नॅान बेलेबल असल्याने जमानत झाली. आता भाजपच्या निवेदनानंतर आणखी काय कलम लावता येतील का, याबाबत कायदेशीर कारवाई करणार आहोत. शेख हुसेन यांच्याबाबत ताज बाबा ट्रस्टमधील काही गैरव्यवहाराची तक्रार आली होती. त्याबाबतही माहिती घेऊ. पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायद्यानुसार कारवाई करत आहो.

- अमितेश कुमार

पोलिस आयुक्त, नागपूर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in