काम करायचे नसेल तर स्पष्ट सांगा, अजित दादांनी एनआयटीला खडसावले...

दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करायचे होते. आता २०२२ उजाडले आहे. आम्ही वेळेत निधी देतो, त्यामुळे तुम्हीसुद्धा वेळेतच बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित आहे, असे अजित दादा (Ajit Pawar) म्हणाले.
काम करायचे नसेल तर स्पष्ट सांगा, अजित दादांनी एनआयटीला खडसावले...
Ajit PawarSarkarnama

नागपूर : नागपुरात आज उद्घाटन झालेल्या पोलिस भवनाचे सुंदर बांधकाम वेळेत पूर्ण केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. पण दुसरीकडे पोलिसांच्या घरकुलाचे बांधकाम रखडवल्यामुळे एनआयटीच्या (नागपूर सुधार प्रन्यास) अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासने पोलिसांच्या घरकुलांचे काम रेंगाळत ठेवले. काम नसेल करायचे तर सांगा, आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे, असे सांगून त्यांनी एक प्रकारे एनआयटीच्या अधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे. नागपूरच्या पोलिस (Police) भवनाचे लोकार्पण अजित दादांच्या (Ajit Pawar) हस्ते झाले. पोलिस भवनाच्या सुंदर बांधकामाची आणि वेळेत पूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पवारांनी प्रशंसा केली. त्याच वेळी आपल्या भाषणातून त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासला खडे बोल सुनावले.

नागपूर सुधार प्रन्यासकडे पोलिसांच्या ३४८ गाळ्यांच्या घरकुलाचे काम सोपवण्यात आले आहे. ही घरकुल योजना लकडगंज येथे पाच एकर जागेत साकारली जात आहे. ही हायटेक इमारत १२ मजली असून अत्याधुनिक पोलिस ठाणेही येथे राहणार आहे. याचा एकूण खर्च १४४ कोटी रुपये इतका आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. सुधार प्रन्यासला दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करायचे होते. आता २०२२ उजाडले आहे. आम्ही वेळेत निधी देतो, त्यामुळे तुम्हीसुद्धा वेळेतच बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित आहे, असे अजित दादा म्हणाले.

Ajit Pawar
अजित दादा म्हणाले, मी सकाळी ८.३० वाजताच मंत्रालयात येतो...

निधी उपलब्ध असताना कामे रेंगाळत ठेवणे मला चालणार नाही. आमच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच गृह विभागाचे गृहनिर्माण दल आहे. याचा उल्लेख करून कामे वेळेत पूर्ण करणार नसाल तर दुसरा पर्याय उपलब्ध आहे, असा अप्रत्यक्ष इशाराही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर सुधार प्रन्यासला दिला. पोलिस भवनच्या उद्घाटन कार्यक्रमाला मंचावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.