अपक्ष आमदार भडकला! सारखं घोडेबाजार, घोडेबाजार म्हणू नका..

आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) म्हणाले, घोडेबाजार या शब्दावर माझा आक्षेप आहे. पुरोगामी महाराष्ट्रात साडेबारा कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहाचे आम्ही सन्माननीय सदस्य आहोत.
अपक्ष आमदार भडकला! सारखं घोडेबाजार, घोडेबाजार म्हणू नका..
MLA Kishor JorgewarSarkarnama

चंद्रपूर : राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणूक आली की एक शब्द वारंवार वापरण्यात येतो, तो म्हणजे घोडेबाजार. राज्यसभेसाठी येत्या १० जूनला मतदान होणार आहे. राजकारण शिगेला पोहोचले आहे आणि सर्व पक्षांचे नेते दररोज घोडेबाजारावर बोलत आहेत. अपक्षांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मात्र या शब्दावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

यावर बोलताना आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) म्हणाले, घोडेबाजार या शब्दावर माझा आक्षेप आहे. पुरोगामी महाराष्ट्रात (Maharashtra) साडेबारा कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहाचे आम्ही सन्माननीय सदस्य आहोत. आमच्या अपक्षांच्या बाबतीत आणि छोट्या पक्षांच्या सदस्यांच्या बाबतीत शंका उपस्थित वाईट, चूक आहे, महापाप आहे. कोणताही राजकीय पक्ष आणि मोठे नेते मागे नसताना आम्ही निवडून सभागृहात जातो. सर्वांना माहिती आहे की, मी एक टोपले विकणाऱ्या आईचा मुलगा आहे. केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे, जनतेच्या प्रेमामुळे आम्ही लोकांच्या हिताचे कायदे करण्यासाठी, त्यांची कामे करण्यासाठी त्या सभागृहात निवडून जातो.

अशा निवडणुका आल्या की, घोडेबाजार-घोडेबाजार सतत म्हणून मतदारसंघात आमची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जाते. पण आता आम्ही हे खपवून घेणार नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार देणार आहे. शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडूनही वारंवार घोडेबाजाराचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याबाबत सांगणार आहे. मान्य आहे की महाराष्ट्रात काही मोठे राजकीय पक्ष आहेत, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि ते अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना विकत घेतात त्यासाठी घोडेबाजार करतात. घोडेबाजार या शब्दावर आम्हा अपक्षांचा आक्षेप आहे, असे आमदार जोरगेवार म्हणाले.

MLA Kishor Jorgewar
Video: पाणीपुरवठा ठप्प, आमदार जोरगेवार संतापले...

आम्ही अपक्षांना आपसात चर्चा केली आणि निवडणूक प्रक्रियेतून घोडेबाजार हा शब्द आता बाद झाला पाहिजे, नाही तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. महाविकास आघाडी सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. मी स्वतः यामध्ये आहे आणि संजय पवार या उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल करताना आम्ही १० अपक्ष लोकांना स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तरीही घोडेबाजार म्हणत विनाकारण अपक्षांची बदनामी केली जात आहे. महाविकास आघाडीजवळ १७० सदस्यांचे बहुमत असल्यानंतर तेथे असा कुठलाही विषय होण्याची शक्यता नाही, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in