त्यांच्या नेत्यांबद्दल बोललं तर जेल, अन् पंतप्रधानांचा अवमान केला तर गुन्हाही नाही !

या प्रकरणी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. पण पोलिस सरकारच्या दबावात आहेत. त्यामुळे त्यांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केला नाही, असे आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) सांगितले.
त्यांच्या नेत्यांबद्दल बोललं तर जेल, अन् पंतप्रधानांचा अवमान केला तर गुन्हाही नाही !
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : ईडी कार्यालयावर काल आंदोलनादरम्यान कॉंग्रेसचे (Congress) माजी शहरअध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत निंदानजक विधान केलं आहे. आम्ही पोलिसांना तक्रार दिली आहे. सायंकाळपर्यंत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही, तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLC Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

शेख हुसेन जे बोलले, त्याचा उच्चारही आता आपण करू शकत नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा पेन ड्राईव्ह आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना दिला आहे. आमचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि सर्व आमदारांनी आज पोलिसांची (Police) भेट घेतली. त्यांना सांगितले की, तुम्ही सुमोटो दखल घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. पण पोलिस सरकारच्या दबावात आहेत. त्यामुळे त्यांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केला नाही, असे आमदार बावनकुळेंनी सांगितले.

आज आम्ही पोलिस उपायुक्त आणि पोलिस निरीक्षकांशी बोललो. त्यामुळे आशा आहे की ते आज सायंकाळपर्यंत शेख हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल करतील. त्यांनी तसे नाही केले तर आम्ही उद्या आंदोलन करू. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांबद्दल कुणी एक वक्तव्य केलं तर त्यांना जेलमध्ये रहावं लागतं. पण येथे दर देशाचे प्रथम नागरिक, पंतप्रधानांबद्दल अत्यंत हीन वक्तव्य करण्यात आले आहे. पण हुसेनवर अद्याप साधा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला नाही.

केतकी चितळेंनी जे आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. आम्ही पण त्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही. पण त्यांच्यावर कारवाई केली, तशी शेख हुसेन यांच्यावरही कारवाई अपेक्षित आहे. कारवाई करताना पोलिसांनी कलमांची चोरी करू नये. या गुन्ह्याअंतर्गत जेवढी कलमं लावली जाऊ शकतात तेवढी कलमं लावली पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. अन्यथा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Chandrashekhar Bawankule
Video: NMRDA चा भ्रष्टाचार बाहेर काढणार !; चंद्रशेखर बावनकुळे

इंधन आकार जनतेकडून घेऊ नये..

इंधन आकार दरवाढ चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. कारण मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये स्वस्त कोळसा वापरून वीज तयार करायला पाहिजे होती. म्हणजे लोकांवर याचा भुर्दंड बसला नसता. सरकारच्या प्रशासकीय चुकांमुळे जनतेला फटका बसला आहे, असा आरोप आमदार बावनकुळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in