संभाजी राजेंनी ‘तसा’ प्रस्ताव दिल्यास आम्ही विचार करू...

या संघटनेच्या पुढील वाटचाली करिता आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र केवळ निवडणुका आल्यात की अपक्ष आमदारांची आठवण येणे राज्याच्या हिताचे नाही, असे आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) म्हणाले.
संभाजी राजेंनी ‘तसा’ प्रस्ताव दिल्यास आम्ही विचार करू...
MLA Kishor Jorgewar and MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale.Sarkarnama

नागपूर : खासदार संभाजी राजे भोसले यांनी राज्य सभा निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. यात अपक्ष आमदार त्यांना मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी अपक्ष आमदारांना तसा प्रस्ताव पाठविल्यास आम्ही समविचारी सर्व अपक्ष आमदार एकत्रित बसून यावर नक्की चर्चा करू, असे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

याबद्दर आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) म्हणाले, त्यांच्याकडून अद्यापतरी अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीशी अपक्ष आमदार रहातीलच, यावर आज ठामपणे भूमिका मांडणे योग्य होणार नाही. संभाजी राजे (Sambhaji Raje Bhosale) यांचे काम मोठे आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेले आंदोलन हे लक्षणीय ठरले आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आज राज्यभरात तयार झाला आहे. त्यांचे विचार लोकांना पटू लागले आहे. मात्र इतर समाजाबाबतच्या आरक्षणाबद्दल त्यांची काय भूमिका आहे, हे ही त्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी छत्रपती, फुले, शाहू महाराज यांच्या विचारांवर चालणारी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या पुढील वाटचाली करिता आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र केवळ निवडणुका आल्यात की अपक्ष आमदारांची आठवण येणे राज्याच्या हिताचे नाही.

अपक्ष आमदार हा आपल्या समाजपयोगी कार्यातून आणि मतदार संघातील नागरिकांच्या प्रत्यक्षरित्या असलेल्या दांडग्या जनसंपर्कातुन बलाढ्य राजकीय पक्षांतील उमेदवारांना पराभूत करत असतो. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीला समोर जाऊन निवडणूक जिंकणे तसे अवघड काम, पण जनतेशी असलेल्या बांधिलकीमुळे अपक्ष आमदार निवडून येतो. मात्र अशा अपक्ष आमदारांचा केवळ निवडूकांपुरता वापर करून घेणे हे राज्याचे दुर्दैव आहे. असे असले तरी आता आज अपक्ष निवडून येणारे लोकप्रतिनिधी राजकारणातील बारकावे समजू लागला आहे.

MLA Kishor Jorgewar and MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale.
आमदार जोरगेवार संतापले अन् म्हणाले, अध्यक्ष महोदय त्यांना जरा सांगा...

अपक्षांची शक्ती संघटित झाली की त्याच्या भव्यतेची जाणीव होणार आहे. त्यामुळे आता अपक्षांनी कोणाला पाठिंबा द्यावा, ते सर्व अपक्ष आमदार एकत्रित येऊन चर्चा करून ठरवतील. संभाजी राजांप्रति आम्हाला आदर आहे. त्यांनी राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व अपक्ष आमदारांनी एकत्रित येण्याचा प्रस्ताव पाठविल्यास त्याचा विचार केला जाईल आणि त्यांच्यासह इतर योग्य उमेदवारांचाही आम्ही निश्चित विचार करू, असे मत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.