आता नथुराम गोडसे नाही तर, भगतसिंह निर्माण होण्याची गरज…

केतकी चितळेसारख्या विकृतीला आता महाराष्ट्र भानावर आणेल. पोलिसांनी तिला अटक केलीच आहे. आता तिच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, असे आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) म्हणाले.
आता नथुराम गोडसे नाही तर, भगतसिंह निर्माण होण्याची गरज…
MLA Kishor JorgewarSarkarnama

नागपूर : केतकी चितळेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर पोस्ट केली. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते चिडले आहेत. सर्वच स्तरातून चितळेचा निषेध केला जात आहे. चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनीही चितळेच्या त्या पोस्टचा खरपूस समाचार घेतला.

चितळेच्या (Ketki Chitale) आधी ‘बारामतीच्या गांधीला ठेचण्यासाठी नथुराम गोडसे तयार झाला पाहिजे’, अशी पोस्ट करण्यात आली होती. त्याचा समाचार घेताना आमदार जोरगेवार (Kishor Jorgewar) म्हणाले, चितळेसारख्या विकृतीला ठेचण्यासाठी नथुराम गोडसे नव्हे तर भगतसिंह निर्माण झाले पाहिजे. आणि केतकी चितळेसारख्या विकृतीला आता महाराष्ट्र (Maharashtra) भानावर आणेल. पोलिसांनी तिला अटक केलीच आहे. आता तिच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठांचा आदर करा ही शिकवण संतांनी दिली. केवळ प्रसिद्ध मिळविण्यासाठी केतकी चितळेने खालच्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टिका पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. आता नथुराम गोडसे नाही तर देशाला अशा विकृत मानसिकतेला ठेचण्यासाठी भगतसिंह निर्माण झाले पाहिजेत, एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल विकृत मानसिकतेतून केलेल्या या टीकेला देश कधीही समर्थन करणार नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी केलेले कार्य देशापुढे आहे. कृषिमंत्री असताना आमचा शेतकरी जगला पाहिजे, तो संपन्न झाला पाहिजे, या भावनेतून त्यांनी त्या काळी उचललेले पाऊल हे कृषी क्षेत्रात नवक्रांती आणणारे होते. त्यांच्या याच कार्यामुळे विरोधीपक्षही आज त्यांचा आदर करतो. अशा ज्येष्ठ नेत्याबद्दल केतकी चितळे यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेली अशोभनीय पोस्ट ही निषेधार्थ आहे. याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. ज्या नेत्याने आपले आयुष्य समाजहितासाठी झिजवले, त्यांनी खुर्चीवर नाही तर लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

MLA Kishor Jorgewar
आमदार जोरगेवार म्हणतात, ‘त्या’ १२० आजारांवरील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करा...

शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाच नव्हे तर छोट्या - छोट्या गावांतील समस्यांची बारीक जाण आहे. जाणता राजा अशी लोकांनी त्यांना पदवी दिली आहे. अशा ज्येष्ठ नेत्याबदल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जहरी टीकात्मक पोस्ट टाकणे हे विकृत मानसिकतेचे प्रतीक आहे. याचा आमदार किशोर जोरगेवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.