मला नाही तर ‘सौं’ ना द्या उमेदवारी, इच्छुकांचे नेत्यांकडे साकडे...

अकोला (Akola) महानगरपालिकेची (Municipal Corporation) मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली. त्यापूर्वी निवडणूक न झाल्याने मनपावर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.
मला नाही तर ‘सौं’ ना द्या उमेदवारी, इच्छुकांचे नेत्यांकडे साकडे...
Akola Municipal CorporationSarkarnama

अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी सामाजिक व महिलांसाठी राखीव प्रभागांचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. आरक्षणाने बहुतांश विद्यमान नगरसेवकांची जागा निश्चित केली असली तरी इच्छुकांची मात्र कोंडी झाली आहे. त्यामुळे माझे नाही जमले तर आमच्या ‘सौं’ना तरी उमेदवारी द्या, असे साकडे आता इच्छुकांकडून नेत्यांना घातले जात आहे.

अकोला (Akola) महानगरपालिकेची (Municipal Corporation) मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली. त्यापूर्वी निवडणूक न झाल्याने मनपावर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेनंतर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली व मंगळवारी प्रभागांचे आरक्षणही जाहीर झाले. अकोला मनपा क्षेत्रात एकूण ३० प्रभागातून ९१ सदस्यांची निवड होणार आहे. त्यातील ४६ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यातील आठ अनुसुचित जाती व एक अनुसुचित जमाती महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेत. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे उर्वरित ३७ जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव राहतील. महिला आरक्षणानंतर तीन सदस्यी प्रभागा पद्धतीनुसार असलेल्या ३० पैकी २३ प्रभागातील प्रत्येकी दोन जागा या महिलांसाठी राखीव झाल्यात. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.

खुल्या एकाच जागेसाठी चूरस..

अकोला मनपातील सर्वच ३० प्रभागातील एकच जागा ही सर्वसाधारण असल्यामुळे या जागेसाठी विद्यमान नगरसेवक विरुद्ध इच्छुक असी चूरस बघावयास मिळत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या महानगराध्यक्षांची डोकेदुखी वाढली आहे. कुणाला उमेदवारी द्यावी व कुणाची मनधरणी करून त्यांची समजूत काढावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कार्यकर्तेही उमेदवारी मिळावी म्हणून नेत्यांची उंबरठे धरून बसले आहेत. मला नाही तर माझ्या कुटुंबातील महिला सदस्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला जात आहे.

Akola  Municipal Corporation
Video: त्यांच्यावर वेळ आली की, असत्यमेव जयते...;सुधीर मुनगंटीवार

अनेक दिग्गजांसाठी खुलणार पुन्हा मनपाचे द्वार..

महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड केला असला तरी दुसरीकडे तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने अनेक दिग्गजांसाठी मनपात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१७ च्या मनपा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यात काही माजी महापौर व उपमहापौरांचाही समावेश होता. त्यातील काहींना महिला आरक्षणाने फायदा झाला आहे तर काही दिग्गजांची गणितं महिला आरक्षणामुळे सरळ झाली आहेत. त्यामुळे या दिग्गजांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in