तेव्हा मी विधानसभा अध्यक्ष नसतो, तर वाझे प्रकरण घडूच दिले नसते...

पटोले (Nana Patole) म्हणाले, सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरण पूर्णतः: बनावट आहे. विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळी मला याविषयी मत नोंदविता आले नाही
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

अमरावती : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण ही भाजपची स्क्रिप्ट होती. आता वाझे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. यामागे भाजपचे षड्यंत्र होते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल अमरावती येथे केली.

अमरावती (Amravati) येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक संकुलामध्ये धनगर कार्यकर्ता परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरण पूर्णतः: बनावट आहे. विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळी मला याविषयी मत नोंदविता आले नाही, तथापि, वाझे प्रकरणातून राज्य मंत्रिमंडळ, महाराष्ट्राला बदनाम करण्याच काम भाजपने केलं, असा आरोप त्यांनी केला.

सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाला. हे संपूर्ण प्रकरण बनावट आहे, हे मला त्यावेळीच माहिती होते. पण त्यावेळी मी विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे आपले मत नोंदवू शकलो नाही. तेव्हा अध्यक्ष न राहता मी सदस्य असतो, तर हे प्रकरण पुढे चालूच दिले नसते. तेथेच विषय संपवला असता. वाझेमुळे अनिल देशमुख जेलमध्ये गेले, हे तर झालेच. पण राज्य मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने वाझेला स्क्रिप्ट देऊन हे सर्व घडवून आणले, असे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
या परंपरेला विरोधी पक्षाकडून तिलांजली : नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नाही. राज्य मंत्रिमंडळातल्या लोकांचे संबंध गुन्हेगारांशी आहे, अशा प्रकारची स्क्रिप्ट तयार करून राज्याला बदनाम करण्याचे काम झाले. मंत्री जेलमध्ये गेले, त्याचे दुःख आहेच. पण हे राज्य आणि राज्यातील १३ कोटी जनता त्या प्रकरणात बदनाम झाली, याचे जास्त दुःख आहे, असे नाना पटोले म्हणाले. हातून सत्ता गेल्यानंतर ५ वर्ष सक्षम विरोधी पक्षाची भूमिका भाजपला निभावता आली असती. पण त्यांनी तसे न करता सरकार पाडण्यासाठी जिवाचा आटापिटा केला आणि अशी बनावट प्रकरणे घडवून आणली. त्यांच्या हाती काही आले नाही. पण नाहक महाराष्ट्र बदनाम झाला, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com