Bawankule : बारामतीत भाजप निवडून येईल, तर घड्याळ बंद होणारच ना...

शरद पवार हे आरोप व्यक्तिगतरीत्या घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी येथे माध्यमांशी बोलताना हाणला.
Ajit Pawar, Chandrashekhar Bawankule and Supriya Sule
Ajit Pawar, Chandrashekhar Bawankule and Supriya SuleSarkarnama

नागपूर : आमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जागतिक कीर्तीचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आमचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवारांवर (Sharad Pawar) आरोप करून आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाहीये. पवारांच्या नेतृत्वावर आम्हाला शंकाही व्यक्त करायची नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतोय. शेवटी आपला पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि आमचा पक्ष वाढवण्याचे काम करत आहो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर (NCP) टिका करताना बावनकुळे म्हणाले, भाजप हायस्पीड बुलेट ट्रेन आहे घड्याळामुळे ती बंद पडणार नाही, भाजप (BJP) बारामतीमध्ये जिंकून येण्याकरिता काम करणार, हे खरे आहे. मग बारामतीत भाजप निवडून येईल तर घड्याळ बंद होणारच आहे. घड्याळ बंद होणे हा वैयक्तिक आरोप नाही. मात्र शरद पवार हे आरोप व्यक्तिगतरीत्या घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी येथे माध्यमांशी बोलताना हाणला.

पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, अरविंद गजभिये, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, संध्या गोतमारे, संजय भेंडे, अशोक धोटे, संजय कंगाले, सुनील मित्रा, बाल्या बोरकर, अविनाश खडतकर, अजय बोढारे, चंदन गोस्वामी उपस्थित होते. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना आम्ही अमेठीमध्ये पराभूत केले. त्यामुळे बारामतीमध्ये शरद पवार यांना पराभूत करण्यास आम्हाला फारसा वेळ लागणार नाही, असे सांगून आमदार बावनकुळे यांनी सहानुभूतीची गरज आमच्यापेक्षा राष्ट्रवादीच्याच नेत्यांनाच अधिक असल्याचे सांगितले.

बावनकुळे यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेसचे घड्याळ बंद करू असे प्रतिपादन केले होते. त्यावर पवार यांच्यावर आरोप करून बावनकुळे स्वतःला मोठे करीत आहेत, वरिष्ठ नेत्यांची सहानुभूती मिळवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्यावतीने केला जात होता. त्यास बावनकुळे यांनी आज प्रत्युत्तर दिले. प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण राज्यभर दौरे करीत आहोत. बारामतीमधील दौरा हा त्याचा भाग होता. हा भाजपच्या प्रचाराचा भाग आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. बारामतीमध्ये आपण शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही आणि भविष्यात करणारही नाही. ती आमच्या पक्षाची संस्कृती नाही. पवार यांच्यावर आरोप करून मोठे व्हायची आम्हाला गरज नाही. आमचा पक्ष त्यांच्यापेक्षा मोठा आहे. राष्ट्रवादीचे नेते मात्र प्रत्येक विधान शरद पवार यांच्याशी जोडतात, वैयक्तिक घेऊन सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असे बावनकुळे म्हणाले.

Ajit Pawar, Chandrashekhar Bawankule and Supriya Sule
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

पटोले यांची ती सवयच..

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा यापूर्वी राष्ट्रवादीचे विदर्भातील घड्याळ बंद पाडू असे वक्तव्य केले होते. याचा त्याच्याशी काही संबंध आहे का अशी विचारणा केली असता बावनकुळे म्हणाले, पटोले यांना बेछूट आरोप करून प्रसिद्धीझोतात राहण्याची सवयच आहे. त्यांचा काँग्रेस पक्ष बुडते जहाज आहे. भाजपसोबत त्यांच्या पक्षाची तुलनाच होऊ शकत नाही. भाजपवर आरोप करण्यापेक्षा पटोलेंनी काम करून मोठे व्हावे, असा चिमटा बावनकुळेंनी काढला. भाजप संघटनशक्तीच्या बळावर आम्ही शिंदे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून आणू, असेही त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या भूमिकेवर ठाम..

भाजप नेहमीच छोट्या राज्यांच्या निर्मितीच्या बाजूने आहे. स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर आम्ही कायम आहोत. जेव्हा केव्हा राज्यांच्या निर्मितीची विषय येईल, तेव्हा आम्ही विदर्भासाठी आग्रही राहू, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in