अर्थमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी कायम राहीन : अजितदादांचा सी-६० जवानांच्या मेहनतीला सलाम!

सी-६० जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकींमध्ये जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

गडचिरोली : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) मुख्यमंत्री होते, तेव्हा तसेच (स्व.) आर.आर. पाटील पालकमंत्री होते, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या विकासाचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह तसेच अर्थ विभाग आहेच. पण, संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. (I will stand by you as Finance Minister : Ajit Pawar's assurance to C-60 jawans)

गडचिरोली येथील सी-६० जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी अजित पवार बोलत होते. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dlip walse patil), आमदार धर्मरावबाबा आत्राम, पोलिस अधिकारी व सी-६० जवानांची पथके उपस्थित होती. ते म्हणाले की, सी-६० जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकींमध्ये जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. या वेळी मंचावर आलेल्या प्रत्येक जवानाची अजित पवारांनी विचारपूस करत कौतुकाची थाप मारली. राज्यात, जिल्ह्यात शांतता अखंड राहावी; म्हणून तुम्ही अहोरात्र मेहनत घेता. त्यासाठी मी सर्व सी-६० जवानांना सलाम करतो, असे गौरवोद्‌गार पवारांनी काढले.

Ajit Pawar
वीजटंचाई : ‘त्यांना बाहेरून वीज घ्यायचीय’; दानवेंचा ठाकरे सरकारवर मोठा आरोप

अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृह विभागाकडून सी-६० जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता. तो तातडीने मंजूर केला. तसेच, यापूर्वी नक्षली भागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्य दलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी नेहमीच प्रयत्न करु, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
दानवेंची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा; एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही जवानांच्या पाठीशी संपूर्ण राज्य सरकार असल्याची ग्वाही दिली. नक्षलवादाविरोधात लढत असताना आता सी-६० जवानांची नवीन ओळख निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांचा बिमोड करणारी टीम म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नक्षल चळवळीतील लोकांमध्येही सी-६० पथकांचा दरारा निर्माण झाला आहे. कर्तव्याला श्रेष्ठ माननाऱ्या जवानांसाठी आम्ही त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ केली. आता पुढील मागण्याही लवकरच पूर्ण करु. याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com