देवतूल्य वसंतराव, सुधाकरराव नाईकांयेवढा मोठा मी कधीच होऊ शकणार नाही...

Sanjay Rathod : पोहरादेवी हे फक्त पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ होऊ नये, तर शैक्षणिक क्रांतीचे स्थळ झाले पाहिजे.
Sudhakarrao Naik, Vasantrao Naik & Sanjay Rathod Latest News
Sudhakarrao Naik, Vasantrao Naik & Sanjay Rathod Latest NewsSarkarnama

पोहरादेवी (जि. वाशीम) : सेवालाल महाराज, (Sevalal Maharaj) जेतालाल महाराज, डाॅ रामराव महाराज यांना विनम्र अभिवादन. पवित्र तिर्थक्षेत्र पोहरा गडचे सुनील महाराज. जितू महाराज, शेखर महाराज, विचारपिठावरील सर्व महंत, समाज बांधव या सर्वांना जय सेवालाल. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मी लगेच येथे येणार होतो. पण महंतांनी सांगितले की, आम्ही १४ ऑगस्टला धर्मपरिषद आयोजित करणार आहोत. त्यामुळे तुम्ही १४ तारखेलाच या. त्यांच्या आदेशाप्रमाणे आज येथे आलो आहे.

देवतुल्य वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यायेवढा मोठा मी कधीच होऊ शकत नाही. पण त्यांनी जो मार्ग दाखविला, त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न मी निश्चित इमानेइतबारे करणार. अशा कितीही अडचणी आल्या तरीही संजय राठोड (Sanjay Rathod) हा हरणार नाही, असे संजय राठोड म्हणाले. (Sudhakarrao Naik, Vasantrao Naik & Sanjay Rathod Latest News)

Sudhakarrao Naik, Vasantrao Naik & Sanjay Rathod Latest News
सुधीरभाऊंना 'वनवास' रवींद्र चव्हाण 'डार्क हॅार्स'

वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी महंतांनी सांगितले. सर्वच प्रश्न मी सोडवीन असे म्हणत नाही. पण प्रयत्न पूर्ण करणार आहे. १०० विधानसभा मतदार संघात आपले लोक आहेत. तेवढे आमदार आपले झाले पाहिजे. आपण आता आपल्या समाजाची ताकत दाखवली पाहिजे. नगारा भवनात आपली संस्कृती, इतिहास याचं दर्शन होते. भूमिपूजनाला लाख लोक होते. भूमिपूजन कार्यक्रम झाल्यावर हेलिकाॅप्टर उडाले आणि मुंबईला पोहोचल. पण लोक येतच होते. आपल्या समाजाच्या २५ प्रश्नांचा पाठपुरावा मी आताही करत आहो. समाजात माझ्यापेक्षाही ज्येष्ठ, श्रेष्ठ नेते आहेत. मनोहरराव नाईक, मखराव पवार, राजेश राठोड, इंद्रनील नाईक, तुषार राठोड, तीन विधानसभा, तीन विधान परिषद आपले आमदार आहेत. मी आपल्या लोकांना माझ्या पक्षात बोलवत नाही. पण समाजाचे विषय येईल तेव्हा जय सेवालाल म्हणून या सर्वांनी भविष्यात एकत्र आले पाहिजे, असेही संजय राठोड म्हणाले.

समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्याची गरज आहे. आपण मुळ विमुक्त भटके आहोत. आपल्याला नाॅन क्रिमिलेअक सर्टीफिकेट लागणार नाही, अशी यंत्रणा निर्माण करायची आहे. आपण देशात १४ कोटी आहोत. सांस्कृतिक धोरणात आपल्या समाजाचा समावेश झाला पाहिजे. अनेत तांड्यांत शाळा नाही, पाणी नाही. काही तांड्यांवर आपल्या आईबहिणी ३-३ किलोमीटर अंतरावरून पाणी आणतात, ही शोकांतिका आहे. आपल्या मुलांना वसतिगृहासाठी आपण आता पाठपुरावा करणार आहोत. मराठा, धनगर, कुणबी समाचासाठी सारथी योजना अंमलात आली आहे. तशी आपल्यासाठी योजना असली पाहिजे. यासाठी सरकारला भूमिका घ्यायला लावणार, असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले.

Sudhakarrao Naik, Vasantrao Naik & Sanjay Rathod Latest News
मेंटेंबद्दल बोलताना सदाभाऊंना अश्रू अनावर

पोहरादेवी हे फक्त पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ होऊ नये, तर शैक्षणिक क्रांतीचे स्थळ झाले पाहिजे. तेव्हाच आपण पोहरा गडला बंजारा समाजाची काशी खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकू. रस्ते, नाल्यांची कामे आता युद्धस्तरावर करणार आहे. समाजने जो विश्वास दाखवला, त्याला तडा जाऊ देणार नाही. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्याला प्राधान्य देणार आहे, असेही मंत्री राठोड म्हणाले.

कबीरदास महाराज म्हणाले, पुन्हा आपला समाज राज्याला मुख्यमंत्री देईल. शिंदेंनी सांगितले पुण्याला सीपीकडे जा चौकशीचा अहवाल घ्या. त्यात क्लिन चिट होती. मग आम्ही उद्धव ठाकरेंकडे गेलो. त्यांना सांगितले. पण नंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. मग त्यांना आम्ही सांगितले की आमच्या समाजाला राज्यात प्रतिनिधीत्व द्यावे, त्यांनी विनंती ऐकली आणि राठोड मंत्री झाले.

Sudhakarrao Naik, Vasantrao Naik & Sanjay Rathod Latest News
शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? मोदी-शहांनी एकनाथ शिंदेंना दिले हे उत्तर...

सुनील महाराज - गेले १८ महिने राज्य सरकारमध्ये समाजाला नेतृत्व नव्हते. सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अनेक समस्या या काळात उद्भवल्या. नाईकांनंतर आता संजय राठोड हेच समाजेचे नेतृत्व आहे. हे धर्मपीठ आहे. संत, महंतांच्या पंक्तीत आज राठोड बसले आहेत. वसंतराव हरीत क्रांती, सुधाकरराव जलक्रांती घडवली. क्रांतिकारी काम केले. उद्धव ठाकरेंनीही शब्द आम्हा महंतांना दिला होता. फडणवीस म्हणाले, महंत आले म्हणजे देशभराती समाज आला. त्यामुळे राठोडांना मी कॅबिनेट मंत्री करतो, असा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळलासुद्धा. पोहरादेवीसाठी १२५ कोटी आणले, आता ५०० कोटी आणणार आहात. त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com