Nagpur : सामान्यांना न्याय देणारी लोकशाही टिकविण्यासाठी आयुष्यभर लढा देईन..

डॉ. गिरीश गांधी अमृत महोत्सव समिती अकोला व डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन नागपूरच्यावतीने (Nagpur) अकोला (Akola) येथील हॉटेल व्ही.एस. इम्पेरियल येथे काल माजी आमदार तथा वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी (Dr. Girish Gadhi) यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
Dr. Girish Gandhi, Nagpur.
Dr. Girish Gandhi, Nagpur.Sarkarnama

Dr. Girish Gadhi अकोला : लोकशाहीचे मूल्य अबाधित राहिले पाहिजे. सध्या ते पायदळी तुडविल्या जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी व्यक्त होणे गरजेचे आहे. ते व्यक्त होत नाही, चांगल्या नेत्याच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे सर्व समस्या उद्‍भवत आहेत. त्यामुळे यापुढे मूल्याधिष्ठित लोकशाही रुजविण्यासाठी जे वंदनीय ते जोपासावे व निंदनीय उखडून फेकावे लागणार आहे. मी सामान्यांना न्याय देणारी लोकशाही टिकविण्यासाठी आयुष्यभर लढा देईल, असा निर्धार अकोला येथील अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी माजी आमदार डॉ. गिरीष गांधी यांनी केला.

डॉ. गिरीश गांधी अमृत महोत्सव समिती अकोला व डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन नागपूरच्यावतीने (Nagpur) अकोला (Akola) येथील हॉटेल व्ही.एस. इम्पेरियल येथे काल माजी आमदार तथा वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी (Dr. Girish Gadhi) यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, (Arun Gujrathi) ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, दिल्लीचे प्रख्यात पत्रकार अशोक वानखेडे, साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आयोजन समितीतर्फे डॉ. गजानन नारे यांनी केले. डॉ.श्रीकांत तिडके यांनी सत्कारमूर्तीसह पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे समयोचित भाषणं झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी, डॉ. गिरीश गांधी यांच्या कार्याचा आढावा घेतला. जीवन कसे जगावे, हे गिरीश यांच्याकडून शिकावे. माणसांशी आणि वृक्षांवर प्रेम करणारा व इतरांचे भाग्य चालविणारे नेतृत्व विदर्भाला लाभले असल्याचे गुजराथी म्हणाले. ज्याप्रमाणे आकाशाचा मांडव हा अदृश्य खांबांवर टिकून आहे, तशा विदर्भाचा अदृश्य खांब म्हणजे गिरीश असल्याचे गुजराथी म्हणाले. डॉ. गांधी यांनी सत्काराराला उत्तर देताना अकोल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा सत्कार अर्पण केला. आभार नाट्यकर्मी अशोक ढेरे यांनी मानले. या कार्यक्रमाला अकोल्यातील गनमान्य व्यक्तींनी हजेरी लावली होती.

Dr. Girish Gandhi, Nagpur.
राहुल गांधींचा अकोला जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम; १६ नोव्हेंबरला होणार आगमन...

चांगले नेते निवडून देणे हे नागरिकांचे कर्तव्य..

सत्कार समारंभाच्या व्यासपीठावरून राजकारणाबाबत बोलायचे टाळले पाहिजे. यापूर्वीच्या दोन कार्यक्रमात मी ते केले. मात्र, येथील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे बोलावे लागत आहे. कोणीतरी व्यक्त झाले पाहिजे. चांगले नेते घडविणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. सर्वच राजकारणांचे मापदंड सारखे आहे. कुणी वेगळा असण्याचा दावा करीत असेल तर ते ढोंग आहे. या देशात लोकशाही व तिचे मूल्य जिवंत राहिली पाहिजे. माणसाचे स्वातंत्र्य खंडीत करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे, असे सांगून डॉ. गिरीश गांधी यांनी प्रचलित राजकीय व्यवस्थेवर भाष्ये केले.

डॉ. गिरीश गांधी यांच्या भाषणातील काही अंश..

- नितीन गडकरी यांच्यामुळे नागपुरातील पहिला सत्कार घडला.

- गडकरीसोबंत असलेल्या संबंधाची राजकारणात किंमत चुकवावी लागली, पण त्याची खंत नाही.

- समाजकारणात येण्याचे कोणी आवतन देत नाही. त्यासाठी कमिटमेन्ट असायला हवी व त्याची किंमतही मोजावी लागते.

- नागरिकांनी व्यक्त होण्यास शिकले पाहिजे.

- अंत पाहू नका, जे सुरू आहे, ते रोखले नाही तर या देशात यादवी होईल.

- जन्म कुणी निवडत नसतो. जिथे जन्माला आले तेथे चांगले व्यक्ती बनता यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in