Nitin Gadkari : विहिरीत उडी घेईल, पण..; वापरा अन् फेका ही पॉलिसी चांगली नाही, गडकरी संतापले

Nitin Gadkari : गडकरींनी हे विधान कुणाला उद्देशून केलं होतं, याबाबतही तर्क लावण्यात आले होते.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama

नागपूर : ‘राजकारणाशिवाय इतर क्षेत्रांमध्येही करण्यासारखं भरपूर आहे’,असे विधान काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींनी (nitin gadkari) नागपूरातील एका कार्यक्रमात केलं होते. त्यामुळं आता गडकरींनी हे विधान कुणाला उद्देशून केलं होतं, याबाबतही तर्क लावण्यात आले होते. (Nitin Gadkari latest news)

त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्तृत्वानं त्यांना पक्षाच्या संसदीय समितीतून वगळलं होतं. त्यामुळं आता गडकरी पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता त्यांनी काही दिवसांपूर्वी राजकारण हे समाजाच्या कल्याणासाठी राहिलेलं नसून राजकारणाचा वापर केवळ सत्तेसाठी होत असल्याचं म्हटलं होतं.

गडकरी हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळं आणि बिनधास्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी विरोधकावर टीका करताना मोदी सरकार, भाजपला घरचा आहेर दिला आहे. आपल्या स्पष्ट स्वभावामुळे ते अनेकवेळा आपल्या पक्षातील सहकाऱ्यांची नाराजी ओढवून घेतात.अशात एक एक किस्सा त्यांनी काल (रविवारी) नागपूरमधील एका कार्यक्रमात सांगितला. ते कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत, याचा खुलासा त्यांनी केला.

Nitin Gadkari
Shiv Sena : २५ वर्षे हिंदुत्वाच्या नावाने नांदलो, भाजपने हिंदुत्वाचा असा कोणता दिवा पेटवला !

नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला संबोधित करताना त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. मी जेव्हा विद्यार्थी जीवनात काम करत होतो तेव्हा मला त्या काळचे कॉंग्रेसचे दिग्गज नेते श्रीकांत जिचकार यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती, परंतु मला कॉंग्रेसची विचारधारा मान्य नसल्यानं मी विहिरीत उडी मारेल पण कॉंग्रेसमध्ये जाणार नाही, असं म्हणत त्यांना उत्तर दिलं होतं.

गडकरी म्हणाले, "कुणाचे वाईट दिवस असो की चांगले दिवस असो, एकदा त्याचा हात धरला की सोडू नका, उगवत्या सूर्याची पूजा करणं योग्य नाही, वापरा आणि फेका ही पॉलिसी चांगली नाही," गडकरींचे हे विधान सध्याच्या केंद्रीय भाजप नेत्तृत्वाला उद्देशून केलं असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राजकारण हे समाजाच्या कल्याणासाठी राहिलेलं नसून राजकारणाचा वापर केवळ सत्तेसाठी होत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं आता गडकरींनी हे विधान कुणाला उद्देशून केलं होतं, याबाबतही तर्क लावण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com