मले काई नाटकं जमत नाई, मले काम जमते; म्हणून जेलमध्ये जा लागत नाई...

नाटक करणारे जेल मध्ये गेले. मला काही लोक म्हणतातही की, एवढं स्पष्ट बोलणं राजकारणात चालत नाही, थोडी नाटकं करावी लागतात. पण मला (Yashomati Thakur) ते आजतागायत जमलेले नाही.
मले काई नाटकं जमत नाई, मले काम जमते; म्हणून जेलमध्ये जा लागत नाई...
Yashomati and Ravi Rana, Navnit RanaSarkarnama

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टाहास करून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी रान पेटवले आहे. या प्रकरणावर आत्तापर्यंत गप्प असलेल्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला आहे.

राणा दाम्पत्याने दादागिरी करून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभर राजकारण ढवळून निघाले. त्यांनी प्रेमाने सरळ सरळ मातोश्रीवर येतो, असं म्हटलं असतं, तर त्यांचं स्वागत झालं असतं, असे मुख्यमंत्री परवा म्हणाले. राणा दाम्पत्याने विनाकारण महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर आता होतो आहे. एफआयआर रद्द करण्याची राणा दाम्पत्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे आणि त्यांची रवानगी कोठडीत केलेली आहे. आता २९ एप्रिल रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

अमरावती जिल्ह्यात राणा दाम्पत्य आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यातून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या शनिवारी २३ एप्रिलला कुठल्याही परिस्थितीत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार, त्यासाठी २२ एप्रिलला कार्यकर्त्यांसमवेत विदर्भ एक्सप्रेसने मुंबईसाठी रवाना होणार, अशी घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. पण गुरूवारी २१ एप्रिलच्या रात्री २.३० वाजताच्या सुमारास ते रस्ता मार्गे नागपूरला विमानतळावर आले आणि तेथून विमानाने मुंबईला गेले. तिकडे अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये शिवसैनिक रेल्वेस्थानकांवर त्यांची वाटच बघत राहिले. तेव्हापासून आत्तापर्यंत पालकमंत्री मात्र या प्रकरणावर बोलल्या नव्हत्या.

आज राणा दाम्पत्यावर प्रहार करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, मी कठोर बोलते, सरळ बोलते आणि स्पष्ट बोलते. मला नाटक करणे जमत नाही. मला काम जमते. नाटक करणारे जेल मध्ये गेले. मला लोक म्हणतातही की, एवढं स्पष्ट बोलणं राजकारणात चालत नाही, थोडी नाटकं करावी लागतात. पण मला ते आजतागायत जमलेले नाही. ‘मले काई नाटकं जमत नाई, मले काम जमते, असे खास वऱ्हाडी भाषेत त्या म्हणाल्या.

Yashomati and Ravi Rana, Navnit Rana
मामा, अमरावतीत तुम्हाला रक्ताचा सडा हवाय का? यशोमती ठाकूरांच्या मुलीनं बोंडेना सुनावलं

१४७ पूरग्रस्त कुटुंबांना पट्टे वाटप करत आहे..

आपल्या जिल्ह्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. लोकांनी निवडून दिले, तर त्यांची कामे आपण केली पाहिजे. पण काही लोक फक्त नाटकं करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवतात. पण आपण वलगाव मधील जवळपास १४७ पूरग्रस्त कुटुंबांना घरांचे पट्टे वाटप करत आहोत. यापुढेही फालतू गोष्टीत लक्ष न घालता लोकांची कामे करण्याकडे आपला कल असणार आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.