मी नाराज नाही,फडणवीस योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री अन् पालकमंत्री म्हणून करतील

Ravi Rana : कुठल्याही अपक्ष आमदाराने नाराज व्हायची गरज नसल्याचे रवी राणा यांंनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis, Ravi Rana Latest News
Devendra Fadnavis, Ravi Rana Latest News sarkarnama

मुंबई : गेले अनेक दिवस लांबलेला शिंदे सरकाराचा बहुचर्चीत असलेला मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी (ता.९ ऑगस्ट) पार पडला आहे. त्यामध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही अपक्ष आमदारास मंत्रीपद देण्यात आले नाही. यामुळे अपक्ष अमदार नाराज आहेत. प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadau) यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील अपक्ष अमदार रवी राणा (Ravi Rana) यांचाही या मंत्रीमंडळ विस्तारात समावेश होऊ शकतो,अशी चर्चा होती. मात्र या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने रवी राणा नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांनीच नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले असून फडणवीस योग्य वेळी संधी देतील, असा विश्नास व्यक्त केला आहे. (Devendra Fadnavis, Ravi Rana Latest News)

Devendra Fadnavis, Ravi Rana Latest News
संजय राठोडांना मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी न्यायच केला...

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला असून या विस्तारामध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांना अशा एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला साथ देणाऱ्या एकाही अपक्षाला यामध्ये संधी देण्यात आली नाही. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होत आहे. यामध्ये बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. मात्र अमरावतीमधील बडनेराचे अपक्ष अमदार रवी राणा यांनाही या मंत्रीमंडळात संधी मिळेल,अशी चर्चा होत होती. मात्र, तसे झाले नाही यामुळे तेही नाराज आहेत, असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत भाजप आणि फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे म्हटले आहे.

Devendra Fadnavis, Ravi Rana Latest News
JD(U)-BJP कशावरुन बिनसले? मोदींनी सांगितले कारण, नितीशकुमारांचेही प्रत्युत्तर

रवी राणा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ऑनलाईनच महाविकास आघाडी सरकार चालवले. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मजबूत सरकार राज्यात आले आहे. मी त्यांना कधी मंत्रिपद मागितले नसून माझी नाराजीही नसल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर कुठल्याही अपक्ष आमदाराने याबाबत नाराज व्हायची गरज नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पुढे राणा म्हणाले की, फडणवीस यांना अमरावती जिल्ह्याची पूर्ण जाण असून ते योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील. अमरावती जिल्ह्याला कोण योग्य न्याय देऊ शकतो याची कल्पना त्यांना असून ते योग्य व्यक्तीची लवकरच निवड करतील, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला. ते एका खासगी वृत्तवाहिनींशी बोलत होते.

Devendra Fadnavis, Ravi Rana Latest News
केसरकर म्हणतात...मी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही, करणार नाही

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. यामुळे त्यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी चर्चा होती मात्र त्यांना संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणूक, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठरावात आमदार राणा यांनी भाजपला साथ दिली होती. यामुळे त्यांना मंत्री म्हणून भाजप सधी देईल, असे अनेकांना वाटत होते. त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आता राणा यांनी आपलं म्हणने स्पष्ट केलं असून ते पुढील मंत्रीमंडळ विस्ताराकडून आशा लावून बसले आहेत. आता पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात अमरावतीचे पालकमंत्री पद बच्चू कडू यांना मिळणार की राणा यांना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com