Nana Patole : मी गरीब माणूस, शेतकरी आहे, म्हणून मी पण त्यांच्याबद्दल बोलत नाही…

Prafull Patel : माझ्याबद्दल ते जे काय बोलले ते योग्य आहे, असे पटोले म्हणाले.
Nana Patole and Prafull Patel
Nana Patole and Prafull PatelSarkarnama

Congress and NCP News : कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्टॅंडर्ड नाहीत, मी फक्त स्टॅंडर्ड लोकांवर बोलतो, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पटोलेंना हिणवले. यावर बोलताना ‘मी गरीब माणूस, एक शेतकरी आहे. त्यामुळे माझ्याबद्दल ते जे काय बोलले ते योग्य आहे, असे पटोले म्हणाले.

अकोला येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी साधा माणूस आहे. त्यामुळे मी त्यांच्या स्टॅंडर्डचा नाही, असे त्यांना वाटत असेल. तर त्यात गैर काही नाही. स्टॅंडर्ड जुळत नाही, म्हणून ते बोलले नाहीत, तर मी पण त्यांच्यावर बोलणार नाही, असे खिलाडू वृत्तीचे प्रत्युत्तर नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी काल केलेल्या वक्तव्यावर दिले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांमधील संघर्ष वाढलेला दिसत आहे. एकीकडे गेल्या वर्षी झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची भाषा कॉंग्रेसचे नेते करतात. पण महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्याशी त्यांचे पटेनासे झाले आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून राज्यातील पाचही जागा जिंकू, असे नाना पटोले सांगत आहेत.

आत्ताच जर शिवसेना आणि राष्ट्रवादीशी त्यांचे खटके उडत असतील आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांची फिरकी घेण्यात गुंतले असतील, तर या निवडणुकीचा निकाल काय लागेल, याबद्दल कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये काळजीत पडलेले दिसतात.

Nana Patole and Prafull Patel
Nana Patole News : नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

काय म्हणाले होते पटेल?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्टॅंडर्ड नाहीत, मी फक्त स्टॅंडर्ड लोकांवर बोलतो. त्यावर नाना टोले यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. पटोले आणि पटेल यांच्यातील वादामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. आधीच पदवीधर शिक्षक मतदार संघात उमेदवार देताना महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.

महाविकास आघाडी दोन नेते आपसात भांडताना दिसत आहेत. एकीकडे भाजपने पदवीधर मतदार संघासह लोकसभेचे रणशिंग फुंकले आणि कामालाही सुरुवात केली. दुसरीकडे महाविकास आघाडी नेते एकमेकांची फिरकी घेण्यास व्यस्त असल्याचे दिसत आहे. नेत्यांमधील भानगडी महाविकास आघाडीला अडचणीच्या ठरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in