Fake Calls to BJP MLA's Again: मलाही मंत्रीपदासाठी फोन आला ... नागपुरातील भाजप आमदाराचा गौप्यस्फोट...

भाजप आमदार विकास कुंभारे यांना मंत्रिपदाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली होती.
Fake Calls to BJP MLA's Again: मलाही मंत्रीपदासाठी फोन आला ... नागपुरातील भाजप आमदाराचा गौप्यस्फोट...

Nagpur MLAs Chitting Case : : मध्य नागपूर मतदारसंघाचे भाजप आमदार विकास कुंभारे यांना मंत्रिपदाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली होती. आपण राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणात नीरज सिंह राठोडला अटकही करण्यात आली.

Fake Calls to BJP MLA's Again: मलाही मंत्रीपदासाठी फोन आला ... नागपुरातील भाजप आमदाराचा गौप्यस्फोट...
Nagpur Cheating With MLA: निरजसिह राठोडला आज आणणार नागपूरात, तीन आमदारांकडून घेतले पैसे?

हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा नागपुरातील आणखी एका भाजप आमदाराला मंत्रीपदाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली आहे. पूर्व नागपुरचे भाजप आ. कृष्णा खोपडे यांना काही महिन्यांपूर्वी पाच फोन कॉल्स आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतून शर्मा नावाच्या व्यक्तीने फोन कॅाल्स केल्याचा दावा आ. खोपडे यांनी केला आहे.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं नाव सांगून शर्मा नावाच्या व्यक्तीने आपल्याला फोन केला होता. पण हा फसवणूकीचा प्रकार असल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने खोपडे यांनी या फोनकडे लक्ष दिलं नाही. आमदार खोपडे यांनाही पैशांच्या बदल्यात मंत्रीपदाची ॲाफर देण्यात आली होती

Fake Calls to BJP MLA's Again: मलाही मंत्रीपदासाठी फोन आला ... नागपुरातील भाजप आमदाराचा गौप्यस्फोट...
Nagpur Cheating With MLA: निरजसिह राठोडला आज आणणार नागपूरात, तीन आमदारांकडून घेतले पैसे?

दरम्यान, आमदारांची फसवणूक करणाऱ्या नीरजसिंह राठोड याला नागपूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सध्या कारवाई सुरु आहे. या प्रकरणात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नीरजने महाराष्ट्रासह गोवा आणि नागालँडमधील आमदारांनाही पैसे मागितले होते.

पोलिसांनी (Police) नीरजला अटक केली. त्याची प्राथमिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नीरजने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुले, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा (Goa) येथील प्रवीण आर्लेकर व नागालँडचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in