HSC Board Paper : बारावीचा पेपर फुटला, तक्रार दाखल; विरोधीपक्षनेते म्हणतात, 'पेपर फोडण्यात सरकारचा सहभाग?'

Ambadas Danve News: पेपरफुटीचा मुद्दा उमटला विधानसभेत...
HSC Bord Paper : Ambadas Danve
HSC Bord Paper : Ambadas DanveSarkarnama

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. पेपर सुरू होण्याच्या अर्धा तासाच्या अवधीतच बारावीचा गणिताचा पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकच चर्चा सुरू झाली. बोर्डाकडून मात्र या पेपर फुटीला अधिकृत दुजोरा दिला गेला नाही. पूर्ण माहिती घेऊनच बोर्ड अधिकृत माहिती जाहीर करणार आहे. या पेपरफुटीचा मुद्दा विधानसभेत ही उपस्थित झाला.

HSC Bord Paper : Ambadas Danve
Mungantiwar : ‘जय जय महाराष्ट्र...’चा निर्णय उत्तम, पण त्यातून एक कडवं का गाळलं ?

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "पेपरफुटीबाबत माहिती घेण्याचं काम सुरू आहे. पेपर व्हायरल झाल्याची बातमी समजली. याबाबत संबंधिच गट शिक्षण अधिकारी, अमरावती शिक्षण विभाग व संबंधितांना कळवले आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितलं आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील. पेपर जरी १०.३० वाजता व्हायरल झाला असला तरी तो जास्त विद्यार्थ्यांना मिळाला नसेल. असा कयास आहे. "

"१४ लाख विद्यार्थी परिक्षेला बसतात. साधरण साडेसहा लाख विद्यार्थी गणिताचा पेपर देतात. पेपरचा एक पानाचा फोटो असू शकतो. चौकशी केल्याशिवाय याबाबत निश्चित माहिती कळणार नाही. पोलीस तक्रार करायला सांगितलं आहे. यानंतर आपल्याला याविषयी धागेदोरे मिळतील. दोषी आढतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल," असे गोसावी यांनी म्हटले आहे.

HSC Bord Paper : Ambadas Danve
Fadanvis : जुन्या पेंशनवर फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, ते आजच निवृत्त होत नाहीये..

दरम्यान, या पेपरफुटीबाबत सिंदखेड राजा येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. या पेपरफुटीबाबत विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे. यात जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कॉपी रोखण्यात म्हणा, पेपर फुटण्यात सरकारचा सहभाग आहे की काय? सरकारची शिक्षण व्यवस्था, नियोजनामुळे असं घडत आहे. पेपर कोणी फोडला याची चौकशी व्हावी, त्वरीत कारवाई करावी," अशी आमची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com