Raj Thackeray |राज्यात आलेला उद्योग राज्याबाहेर जातोच कसा? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray |राज्यात आलेला उद्योग राज्याबाहेर जातोच कसा? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray | उद्योजकांची पहिली चाॅईस महाराष्ट्र असतो.

नागपूर : महाराष्ट्रात उद्योगांवर आपले लक्ष नसेल तर, आपण त्यांच्याकडे पैसे मागणार असू तर ते उद्योग का आपल्याकडे येतील. फक्त उद्योग आपल्याकडे येत आहे, हे महत्त्वाचं नाही तर त्यातून आपल्याला किती रोजगार मिळणार आहे, त्या भागाचा विकास कसा होणार आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. आतापर्यंत जे उद्योग महाराष्ट्रात आले त्यांच्यासाठी आपण रेड कार्पेट टाकलं त्यातूनच महाराष्ट्राची प्रगती झाली. उद्योजकांची पहिली चाॅईस महाराष्ट्र असतो. मग महाराष्ट्रात आलेला उद्योग गुजरातमध्ये जातोच कसा. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. १९९९ ते २००४ ची गोष्ट आहे. बीएमडब्ल्यूचा प्रकल्प येणार होता. विलासराव देशमुख सरकार होते. मिटींग ठरली आणि काहीतरी कारणाने त्यांना जावं लागलं. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की मिटींग अटेंड करा. सर्व अधिकारी आणि उदयोजक बसले.अधिकारी दाक्षिणात्य होते. उद्योगांना पायाभूत सुविधा लागतात त्यावर चर्चा सुरू केली आणि अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाढा सुरू केला. जमिन, पाणी, वीज याबाबतीत बोलतो, कळवतो, ठरवतो, अशी उत्तरे दिली.

Raj Thackeray |राज्यात आलेला उद्योग राज्याबाहेर जातोच कसा? राज ठाकरेंचा सवाल
जर युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला होता तर अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद कुठून आलं?

शेवटी अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही निघतो. ते निघाले आणि दाक्षिणात्य सहकाऱ्यांना काॅल केला. नाव, नंबर दिला. संपर्क साधायला सांगितला. अशा प्रकारे महाराष्ट्रात येणारा कारखाना तामिळनाडूला गेला. येणाऱ्या उद्योगांकडून आपण पैसे मागत असू, तर ते चुकीचे आहे. महाराष्ट्र मोठा होण्याचे कारणच उद्योगांच्या येण्यामध्ये आहे.

हिंदुत्वाचे चार वाटेकरी झाले, असे विचारल्यास म्हणाले, मराठीला नख लावाल, तर मराठी म्हणून तुमच्या अंगावर येईल, हिंदुत्वाला नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर येईल. रजा अकादमीच्या वेळी मी मोर्चा काढला तेव्हा इतर हिंदुत्ववादी कुठे होते. पाकिस्तानी कलावंताला हाकलून लावले, तेव्हा का कुणी विचारले नाही.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले की, फिरू द्या त्यांना. पण यावेळेला राज्यभर आमचे नगरसेवक वाढतील. चारचा प्रभाग हे जे काही चालू आहे, हे लोकशाहिला घातक आहे. एक नगरसेवकाला मतदान करतो, त्याने आमचे काम करावे, ही अपेक्षा आहे. चार-चार नगरसेवक असले तर कुणाला सांगणार, कामे कशी होणार, लोकांचे नुकसान राजकीय लोक करतात. वाॅर्डाचीच निवडणूक झाली पाहीजे, असे म्हणत राज्य सरकारच्या धोरणावर टिका केली. ज्याचे नगरसेवक जास्त, त्याचा महापौर बसला पाहीजे. या पद्धतीत तुम्ही कुणाला जबाबदार धरू शकत नाही. महापालिका ओरबाडली जाते. या सिस्टीम बदलण्याची काय गरज, असा प्रश्न त्यांनी केला. यामध्ये फक्त नगरसेवक गब्बर होतात.

लोकांना फुकटात पाणि, अन्न देण्याच्या मी विरोधात आहे. फुकटात द्या, अशा मागणीचा एकही मोर्चा निघाला नाही. टॅक्स घेता अन् सांगता की फुकटात देतो. मोफत घरे देण्याच्या वेळी मी बाळासाहेबांनाही बोललो होतो, की फुकटात दिले नाही पाहिजे. फुकट्या लोकांना थारा देता कामा नये. उपमुख्यमंत्री इथलेच आहेत, त्यांना विचारा की शेतकरी आत्महत्या केव्हा थांबणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com