HSC Paper Leak Case: बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला कसा? आता 'एसआयटी' तपासणार

Math Paper Leak News: दोन शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
12th math paper leak News
12th math paper leak NewsSarkarnama

Buldhana News: बुलढाण्यातील सिंदखेड राजा (Sindhkhed Raja) येथे बारावीचा गणिताचा पेपर फुटला होता. या प्रकरणी दोन शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. 'एसआय'टी तपासानंतर या प्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यातील बुलढाण्यात (Buldhana) झालेल्या पेपरफुटीप्रकरणी तपास करण्यासाठी 'एसआय'टी तपास पथक तयार करण्यात आले आहे. मेहकरचे पोलीस अधिक्षक याबाबत तपास करणार आहेत. या तपासानंतर मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या प्रकरणी दोन शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

12th math paper leak News
Konkan News : रत्नागिरीत भास्कर जाधवांच्या जोडीला ठाकरे गटाला मिळाला आक्रमक नेता

बुलढाण्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वी आर्धा तास आधी ९९ जणांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आला. या परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रूपये घेतल्याची माहिती आहे. या ग्रुपमध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक व विविध क्षेत्रातील काही व्यक्तींचा समावेश होता. मात्र पेपरफुटीची घटना समोर आल्यानंतर तो ग्रुप डिलीट केला.

दरम्यान, पोलिसांनी चौकशी करून दोन शिक्षकांवर कारवाई केली. आता 'एसआयटी' तपासानंतर या प्रकरणी आणखी मोठी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in