सोने उघड्यावर पडले असताना शेतकऱ्यांना झोप कशी येणार?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel यांनी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले होते.
सोने उघड्यावर पडले असताना शेतकऱ्यांना झोप कशी येणार?
Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel Sarkarnama

भंडारा : महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय पक्षातील जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले होते. पण या उद्घाटनाचा सोहळा हा फार्स ठरला. आज 27 दिवस उलटूनही शेतकऱ्यांच्या धानाचा दाणाही खरेदी केला गेला नाही. ही धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी थट्टा आहे.

शेतकऱ्यांनी पिकवलेले धान उघड्यावर पडले आहे. हे धान म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोने आहे. त्यामुळे सोने उघड्यावर पडले असताना झोप कशी येणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. ३० ऑक्टोबरला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले होते. पण हा केवळ देखावा होता, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता तरी तात्काळ धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. पूर्व विदर्भातील भंडारा हा मुख्य धान उत्पादक जिल्ह्यांपैकी एक आहे. येथील बहुतांश शेतकरी धानाचे उत्पादन घेतात आणि सरकारकडून हमी भाव देऊन धानाची खरेदी केली जाते.

दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला धान खरेदी सुरू होऊन जाते. मात्र खरिपाचे धान पिकून कापणी होऊनही अद्याप धान खरेदी सुरू झाली नाही. विशेषतः जिल्ह्यातील नेत्यांनी दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू करणार आणि दिवाळीत लोकांच्या घरात धान विक्री करू पैसे येणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसे 30 ऑक्टोबरला धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन करून देखावाही करून जिल्ह्यातील नेत्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. खरेदी सुरू करायची नव्हती तर उद्घाटनाचा देखावा का केला, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत.

Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel
मलकापूर अर्बन बॅंकेवर RBI चे निर्बंध, भाजप नेते चैनसुख संचेती आहेत अध्यक्ष...

विशेष म्हणजे यावेळी सतत शेतकऱ्यांचे कैवारी बनून फिरणारे विरोधकही बोलायला तयार नाहीत. दोन महिन्यांपासून तुम्ही पीक पेरा ऑनलाइनची भानगड लावली. आम्ही तीसुद्धा पूर्ण केली. मात्र आता तुमचे अडले कुठे, असाही प्रश्न त्यांना पडला आहे. यात शेतकऱ्यांच्या डोक्याच्या मागे ताप कमी होता की काय म्हणून ८ दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत धुमाकूळ घालत आहे. आता धान सुरक्षित कसा ठेवावा, असा प्रश्न उभा ठाकल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यात धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे शेतमजुरांचे पैसे व चुरना करण्यासाठी वापरलेल्या मशीनचे भाडे शेतकरी देऊ शकलेले नाहीत.

शेतकरी, शेतमजूर व शेतीउपयोगी यांत्रिक उपकरणांवर पोट भरणारे असे सर्वांची दिवाळी अंधारात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान खरेदी सुरू न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला असून धान खरेदी सुरू करण्याची मागणी करत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात धान खरेदी करण्याबाबतचे वेळापत्रक ठरले आहे. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दरवर्षी वेळापत्रक कोलमडत असल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आले आहेत. जिल्ह्यातील सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. या जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असे शेतकरी बोलत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in