Sameer Wankhede's Kotwal Book.
Sameer Wankhede's Kotwal Book.Sarkarnama

१५० वर्षांपासूनचा इतिहास खरा की एकटे नबाव मलिक, सारडांचा सवाल…

वानखेडे Sameer Wankhede कुटुंब सुशिक्षित आहे. अशा लोकांना त्रास देऊन मंत्री मलिक Minister Nawab Malik यांना काय साध्य करायचे आहे, असे हरिष सारडा Harish Sarda म्हणाले.

नागपूर : एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्याभोवती सद्यस्थितीत महाराष्ट्राचे राजकारण फिरते आहे. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर समीर एकदम चर्चेत आले. त्यानंतर मंत्री नवाब मलिक हे रोज त्यांच्यावर सातत्याने विविध आरोप करीत आहेत. समीर यांच्या बाजूने त्यांचे समर्थक एकवटले आहे. १५० वर्षांपासूनचा इतिहास ज्यामध्ये कोतवाल बुकाची नक्कल आहे, तो खरा की एकटे नबाव मलिक खरे, असा प्रश्‍न समीर यांचे मूळ गाव असलेल्या वाशीम जिल्ह्यातील हरिष सारडा यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाबद्दल सारडा म्हणाले, समीर वानखेडे यांच्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. त्यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे उत्पादन शुल्क विभागात होते. आता ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्या नोकरीदरम्यान त्यांनी आपले नाव किंवा धर्म बदलला असेल तर तसे गॅझेट नोटीफिकेशन त्यांनी दिले असेल. त्यानुसार त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न असायला हवे. पण तसे काहीही पुरावे मंत्री मलिक यांनी अद्याप सादर केलेले नाहीत. खोटे नाव आणि खोटा धर्म धारण करून कुणी येवढे वर्ष नोकरी कशी काय करू शकतो, असा सवालही सारडा यांनी उपस्थित केला. समीर वानखेडे आमच्या जिल्ह्यातील असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

सारडा म्हणाले, आज समीर ४५ वर्षांचे आहेत. त्यांचे वडील ज्ञानदेव हे ७५ वर्षांचे असतील, (अंदाजे) समीरचे आजोबा कचरू हयात असते तर १०० ते ११० वर्षांचे असते आणि त्यांचे पणजोबा कळणूजी हे १४०-१५० वर्षांचे. याप्रमाणे त्यांच्या वंशावळीचा जरी विचार केला, तरीही आपण स्वातंत्र्यपूर्व काळात जाऊ पोहोचतो आणि त्यावेळी कोतवाल बुकात नोंद केली जायची. त्या कोतवाल बुकाची नक्कल वानखेडे कुटुंबीयांनी सादर केली आहे. ती कशी काय खोटी असू शकते आणि आज जर त्यांना खोटे धंदे, घोटाळे करायचे असतीलही तर त्याचे नियोजन १००-१५० वर्षांपूर्वी कसे काय होऊ शकते?

समीर ज्ञानदेव वानखेडे यांच मूळ गाव हे वाशीम जिल्ह्यातील वरुड तोफा हे आहे. या गावात त्यांचे वडिलोपार्जित घर जमीन आहे. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त असून, सध्या वाशीम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे बघितली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचे दिसून आले. शंकरराव वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे मुंबईला लोखंडवाला परिसरात राहतात. त्यांना टोपण नाव दिले असेल. मात्र, हे राजकीय आरोप आहेत. माझ्या भावाचे नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी त्यांनी ज्ञानदेव वानखेडे यांच्या शाळेचा दाखलाच दिला. त्यामध्ये त्यांच्या जातीचाही उल्लेख आहे.

Sameer Wankhede's Kotwal Book.
वाशीम जिल्ह्यातील ‘हे’ आहे समीर वानखेडेंचे मूळ गाव, काका अजूनही राहतात…

राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सहभागी आहे. अबकारी शुल्क खाते राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी ज्ञानदेव वानखेडे यांची सर्वीस शीट तपासून बघावी आणि मंत्री नवाब मलिकांचे समाधान करून द्यावे. वानखेडे यांच्याकडे ४ एकर वडिलोपार्जित जमी आहे. गेल्या ३० वर्षांत त्यामध्ये एक गुंठाही वाढ झालेली नाही. वानखेडे कुटुंब सुशिक्षित आहे. अशा लोकांना त्रास देऊन मंत्री मलिक यांना काय साध्य करायचे आहे, हे समजण्यापलीकडचे असल्याचेही हरिष सारडा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com