मुंबईच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर जिल्हाप्रमुखाला शिवीगाळ, तोडफोडही केली...

विश्राम भवनात मुंबईहून आलेल्या पदाधिकाऱ्यांसमक्ष शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाध्यक्ष अनिल देवतारे यांना शिवीगाळ करीत तोडफोड करण्यात आली.
Shivsena Meeting
Shivsena MeetingSarkarnama

वर्धा : वर्धा (Wardha) विधानसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या नव्या नियुक्तीवरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादातून येथील विश्राम भवनात मुंबईहून आलेल्या पदाधिकाऱ्यांसमक्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष (Shivsena District Chief) अनिल देवतारे यांना शिवीगाळ करीत तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून तोडफोड करणाऱ्या तुषार देवढेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या शिवसेना (Shivsena) सत्तेत असल्याने पक्षविस्ताराचे काम सुरू आहे. यात काही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आतापर्यंत तुषार देवढे काम करीत आहेत. यात पक्षाच्यावतीने त्यांचे पद काढून त्याऐवजी नव्या पदाधिकाऱ्याची निवड केली. यामुळे तुषार देवढे यांनी मनात राग धरून मुंबईहून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. शिवाय येथे असलेल्या साहित्याची तोडफोडही केली.

हा प्रकार घडला त्यावेळी वर्ध्यात शिवसंपर्क अभियानासाठी आलेले मुंबई येथील पदाधिकारी उपस्थित होते. त्याच्या समक्ष घडलेला हा वाद थेट मुंबईत पक्षप्रमुखांसमोर पोहोचल्याने वर्ध्यातील शिवसैनिकांच्या शिस्तीची माहिती त्यांना मिळाली. या प्रकरणी संपर्क प्रमुखांच्या तक्रारीवरून तुषार देवढे याच्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

Shivsena Meeting
वर्धा जिल्ह्यात भाजपला धक्का, पदाधिकारी व नगरसेवक शिवसेनेत दाखल...

पक्षश्रेष्ठी घेत आहेत पक्षाच्या स्थितीची माहिती..

राज्यात येत्या काळात निवडणुका होणार आहेत. यामुळे सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून त्यांच्या शक्तीची चाचपणी सुरू आहे. यामुळे त्यांच्याकडून गावपातळीवर पक्षाच्या स्थितीची माहिती घेण्यात येत आहे. अशात वर्ध्यात घडलेल्या या प्रकारामुळे येथील पक्षाची स्थिती काय आहे, याचा अंदाज त्यांना आला असावा.

पदाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या तुषार देवढे यांचे पद गेल्याने ते मनात राग धरून होते. शिवसंपर्क अभियानासाठी मुंबई येथील पदाधिकारी आले असताना त्यांनी त्यांच्या समक्ष नशा करून शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे.

- अनंत गुढे

संपर्क प्रमुख, शिवसेना वर्धा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com