Politics : सत्यजीत तांबेंनी भाजपला पाठिंबा मागितलाय का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...

Maharashtra Politics : नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कोणाला पाठिंबा देणार?
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे ते चर्चेत आले. तर डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं, ''मी सर्व पक्षांचा पाठिंबा मागणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहे'', असं ते म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबेंनी भाजपला पाठिंबा मागितला आहे की नाही? याबाबत माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितलं आहे.

Chandrasekhar Bawankule
Nana Patole : दावोसवरून काय आणले ते जाऊ द्या, आधी गुजरातला गेलेल्या उद्योगांचं काय ते बोला !

बावनकुळे म्हणाले, ''राष्ट्रवादीमध्ये (NCP) देखील बंडखोरी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) परिस्थिती अवघड झाली आहे. सत्यजीत तांबेंनी आत्तापर्यंत तरी समर्थन मागितले नाही. पण त्यांनी समर्थन मागितले तर त्याबाबत आमच्या पार्लमेंट्री बोर्डाकडे हा विषय मांडू. त्यानंतर पार्लमेंट्री बोर्ड यावर चर्चा करून पुढे काय निर्णय घ्यायचा ते ठरवेल'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Chandrasekhar Bawankule
Satyajit Tambe : मी वादळ शांत होण्याची वाट पाहतोय; सत्यजीत तांबेंचे महत्वाचे विधान

''मात्र, अद्याप सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी समर्थन मागितलेले नाही. त्यामुळे आमचे समर्थन कुणाला असणार हे येणारा काळच ठरवेल'', असं सूचक वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. दरम्यान, सत्यजित तांबेंनी भाजपकडे पाठिंबा मागितला की नाही? याबाबत संभ्रम तयार झाला असतानाच बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप (BJP) नेमकी कोणाला पाठिंबा देणार? हा सस्पेन्स अद्यापही कायम असल्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आलेलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in