'शिवाजी'च्या अध्यक्षपदी पुन्हा हर्षवर्धन देशमुख, 'विकास'ला एकच जागा...

विदर्भातील (Vidarbha) अग्रगण्य व राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली आहे.
Harshawardhan Deshmukh, Vidarbha
Harshawardhan Deshmukh, VidarbhaSarkarnama

नागपूर : विदर्भातील (Vidarbha) अग्रगण्य व राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्री शिवाजी (Shivaji) शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. हर्षवर्धन देशमुख अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.

प्रगती पॅनलने कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदासह नऊपैकी आठ जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले. शिवपरिवारातील सभासदांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत शिक्कामोर्तब केले. विकास पॅनलच्या एका उमेदवाराचा उपाध्यक्षपदी विजय झाला. कार्यकारी परिषदेच्या नऊ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. एकूण ७७४ पैकी ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शिलेदारांची निवड केली. रात्री साडेदहाच्या दरम्यान पहिला निकाल हाती आला.

निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. बी. के. गांधी यांनी चारही जागांचे निकाल एकाच वेळी जाहीर केले. चारही जागा प्रगती पॅनलने जिंकल्या. यामध्ये हेमंत काळमेघ हे सर्वाधिक ४९० मते घेऊन विजयी झाले. अन्य विजयी उमेदवारांमध्ये प्रगती पॅनेलचे केशव गावंडे (३८७), सुरेश खोटरे (३३१) व सुभाष बनसोड (२८०) यांचा समावेश आहे. विकास पॅनलच्या चारही उमेदवारांचा पराभव झाला. या पॅनलच्या रमेश हिंगणकर यांना १९५, सुरेंद्र आंडे २१२, नरहर होले १६५ व दिनकर गायगोले यांना २६२ मते मिळाली. स्वतंत्र उमेदवार डॉ. प्रमोद झाडे १५८ व आनंद देशमुख यांना ५९ मते मिळाली.

Harshawardhan Deshmukh, Vidarbha
मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; "अमरावती आणि हिंगोलीच्या समस्या सोडवा"

उपाध्यक्षपदासाठीच्या तीनपैकी एक जागा विकास पॅनलने जिंकली. विकास पॅनेलचे केशव मेतकर २९५ मते मिळवून विजयी झाले. प्रगतीचे अ‍ॅड. गजानन पुंडकर व अ‍ॅड. जयवंत पाटील पुसदेकर निवडून आले. पुंडकर यांना ३९२ तर जयवंत पाटील यांना ३१८ मते मिळाली. स्वतंत्र उमेदवार विठ्ठल वाघ यांना १३५ मते मिळाली. पराभूत झालेल्या विकास पॅनलच्या शरद तसरे यांना १८६ व डॉ. अशोक अरबट यांना २८९ मते मिळाली. कोषाध्यक्षपदीही प्रगती पॅनेलचे दिलीप इंगोले विजयी झाले असून त्यांना ४२४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी विकास पॅनेलचे उमेदवार बाळूपंत वैद्य पराभूत झाले असून त्यांना २४२ मते मिळाली. अध्यक्षपदी प्रगती पॅनेलचे हर्षवर्धन देशमुख विजयी झाले असून त्यांना ३८९ मते मिळाली. तर विकास पॅनलच्या नरेशचंद्र ठाकरे यांना २७२ मते मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in