
Amravati Bazar Samiti News| अमरावती बाजार समितीचा निकाल शनिवारी (२९ एप्रिल) जाहीर झाला. या निवडणुकीत आमदार रवी राणांच्या पॅनल विरुद्ध काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होती. यामुळे रवी राणांचे भाऊ सुनील राणा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने रवी राणांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाने १८ पैकी १८ही जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली. (Yashomati Thakur Criticized on Ravi Rana)
या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी रवी राणांवर निशाणा साधला आहे. ज्यांनी गटबाजी करण्याचा प्रयत्न केला, जे शिवसेनेतून फुटले, जे काँग्रेसमधून फुटले, ज्यांनी उद्धव ठाकरेंचा अपमान केला, ज्यांनी सोनिया गांधींचा अपमान केला, ज्यांनी शरद पवारांचा अपमान केला, त्यांना हनुमानजींनी दाखवून दिलं, अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी रवी राणांना डिवचलं आहे. (Amaravati Bazar Samiti Result)
दरम्यान, या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, युवा स्वाभिमान पॅनलचा दारुण पराभव झाला. तिवसा बाजार समितीवर काँग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. १८ पैकी १८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्यांदा माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील बाजार समितीत ठाकरे गटासोबत उमेदवार दिले. यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश मिळाले आहे. ( Vidarbha APMC Elections Result)
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, युवा स्वाभिमान पॅनलचा दारुण पराभव झाला. तिवसा बाजार समितीवर काँग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. १८ पैकी १८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्यांदा माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील बाजार समितीत ठाकरे गटासोबत उमेदवार दिले. यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश मिळाले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.