Hansaraj Ahir : हंसराज अहीर म्हणतात, मूर्खांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही...

appointment : केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहीर यांची निवड करण्यात आली आहे.
Hansaraj Ahir
Hansaraj Ahir Sarkarnama

Central Commission for Backward Classes : केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेल्या योजनांचा लाभ या राज्यातील लोकांना कसा मिळेल, यासाठी काम करण्याचा अधिकार आयोगाला दिलेला आहे. हा आयोग १९९३ साली स्थापन करण्यात आला होता. त्यावेळच्या सरकारने आयोगाला अधिकार दिले नव्हते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आयोगाला सांविधानिक अधिकार दिले आणि शक्ती प्रदान केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे विषमता संपवणे आणि सर्वांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आता आयोगातर्फे केला जाणार आहे. विद्यार्थी, कामगार, मजूर सर्वांनाच न्याय देण्याचे काम केले जाणार आहे, असे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले.

केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर (Hansaraj Ahir) यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रथमच ते नागपुरात (Nagpur) आले असताना विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी होते. कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी (OBC) आणि मराठा बांधवांबाबत ताबडतोब निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. सरकारमध्ये विधिमंडळात जसे ठराव पारित होतात, त्याप्रमाणे आयोगाला निर्णय घ्यावे लागतात. हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले जातात. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. सद्यःस्थितीत देशभरातून ४० प्रस्ताव आलेले आहेत. या प्रस्तावांना तात्काळ न्याय द्यायचा आहे. मराठा आरक्षणाबाबत सध्याच काही सांगता येणार नाही. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल.

Hansaraj Ahir
छगन भुजबळ केवळ वेळ मारून नेत आहेत : हंसराज अहीर

छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणारे अतिशय मूर्ख लोक आहेत. त्यांना शिवाजी महाराज कळलेलेच नाहीत. महान युगपुरुषाचे महत्व त्यांना समजलेले नाहीये. हे विकृत लोक आहेत. त्यामुळे अशा मूर्खांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत महाराजांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी महाराजांचे महत्व वाढविलेलेच आहे. महाराजांबद्दल कोण काय बोलले, हे मी समक्ष ऐकलेले नाही. पण बोलण्याचा उद्देश तो नव्हता, असेही ते लोक म्हणत आहेत. तरीही तसंच ते बोलले असतील, तर ते चांगले नाही. कारण शिवाजी महाराज हे राज्यातील, देशातीलच नाही तर जगात मान असलेले व्यक्तिमत्त्व आहेत, असे हंसराज अहीर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com