Hansaraj Ahir News: सहमती नव्हती, तर हंसराज अहीरांनी तेव्हाच का नाही सांगितले ?

Chandrakant Khaire: या विषयावर मी आज काही बोलण्याच्या मनःस्थितीत नाही.
Chandrakant Khaire, Sudhir Mungantiwar and Hansaraj Ahir
Chandrakant Khaire, Sudhir Mungantiwar and Hansaraj AhirSarkarnama

Chandrapur News : लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवाला भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर हंसराज अहीर यांच्या पराभवाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदार आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी परवा २८ फेब्रुवारीला केला होता. यावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी काल रात्री प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत खैरे यांनी उपरोक्त आरोप परवा मंगळवारी केला होता. हंसराज अहीर जर त्यांच्या वक्तव्याशी सहमत नव्हते, तर ते तेव्हाच प्रतिक्रिया देऊन असहमती दर्शवू शकत होते. यासंदर्भात ‘सरकारनामा’ने त्यांना कॉल करून प्रतिक्रिया विचारली होती. तेव्हा ‘या विषयावर मी आज काही बोलण्याच्या मनःस्थितीत नाही, माझी बोलण्याची इच्छा नाही.

वाटलं तर उद्या मी या विषयावर बोलेन आणि नाही वाटलं तर बोलणारही नाही’, असे ते म्हणाले होते. त्यानंतर काल रात्री त्यांच्या कार्यालयातून माध्यमांना प्रतिक्रिया पाठवण्यात आली. खैरेंच्या त्या आरोपावर अहीर म्हणतात, ‘चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही. आमच्या पक्षात भांडणे लावण्याचा त्यांचा मानस आहे.

जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्यांच्या या वक्तव्याला मी महत्व देणार नाही. त्यांचे हे वक्तव्य माझ्या भेटीच्या एक दिवस पूर्वीचे होते, याची मला कल्पना असती तर मी भेट टाळली असती.’ पण जर अहीर खैरेंच्या वक्तव्याशी सहमत नव्हते, तर त्यांनी तेव्हाच का प्रतिक्रिया दिली नाही, हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Chandrakant Khaire, Sudhir Mungantiwar and Hansaraj Ahir
Chandrakant Khaire News: ओवेसींकडे जायला आम्ही लाचार नाही, बावनकुळेंनी सांभाळून बोलावं !

खैरेंचे ते वक्तव्य एक दिवसापूर्वीचे होते, असे अहीरांचे म्हणणे आहे आणि ते त्यांना माहिती नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे. अहीर चार वेळा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. २०१९ ला पहिल्यांदा त्यांचा राभव झालेला नाही. तर यापूर्वीसुद्धा त्यांचा पराभव झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री राहून चुकलेले अहीर यांचा राजकारणाचा दांडगा अनुभव आणि वावर आहे. त्यामुळे खैरेंसारखे ज्येष्ठ नेते आरोप करतात आणि अहीरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना ते माहिती नसावे, ही बाब काहींना पटत नाहीये.

Chandrakant Khaire, Sudhir Mungantiwar and Hansaraj Ahir
Sudhir Mungantiwar News: ...अन्यथा ही एक फॅशन होऊन जाईल, असं का म्हणाले सुधीर मुनगंटीवार !

हंसराज अहीर आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) सभागृहात सहकारी राहिलेले आहे. दोघांचाही पराभव २०१९च्या लोकसभा निवडणुकीत (Election) झाला. दोघेही समदुःखी आहेत. अहीरांच्या समर्थकांनी निकालानंतर नाराजीची पोस्ट सोशल मिडियावर टाकली होती. त्यामुळे कधीतरी चर्चेदरम्यान अहीरांनी खैरेंना सदर बाब सांगितली असावी. त्यामुळेच ‘अहीरांच्या पराभवाला वनमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) जबाबदार आहेत’, असे वक्तव्य केले असावे, असाही कयास लावला जात आहे.

जेव्हा खैरेंचे ते वक्तव्य माध्यमांमध्ये झळकले, तेव्हाच अहीर त्यावर असहमती दर्शवू शकले असते. पण त्यांनी तसे न करता बराच वेळ घेतला आणि काल सायंकाळी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ही वाट कशासाठी बघितली? खैरेंचा आरोप त्यांना कुणावर शेकवायचा होता का? किंवा त्यांनी मधल्या काळात तसे प्रयत्न केले का, असेही प्रश्‍न राजकीय जाणकार उपस्थित करत आहेत. खरे-खोटे त्यांनाच माहिती. पण हे प्रकरण अहीरांच्या अडचणी वाढवणारे ठरू शकते, याची शक्यता नाकारता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in