Grampanchayat Election : कडाक्याच्या थंडीत तापू लागले ग्रामपंचायतीचे राजकारण...

Nagpur : इच्छुकांची धावपळ सुरू असून थंडीत राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Nagpur
NagpurSarkarnama

Politics of Villages : राजकारणाची (Politics) पहिली पायरी म्हणून कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था असलेले सदस्य मनात उलथापालथ घेऊन तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात पुन्हा गर्दी दिसून आली. विविध दाखले मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू असून थंडीत राजकीय वातावरण तापू लागले आहे.

आमदारांच्या (MLA) स्थानिक धानला गावात तर चिरव्हा, तारसा, चाचेर, माथनी, खात, कोदामेंढी ह्या गावात जास्तच राजकारण तापलेले दिसून येत आहे. तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद (ZP) सदस्य कैलाश बरबटे यांच्यासाठी ही निवडणूक (Election) महत्वाची असल्यामुळे बरबटे यांचे बंधू कुंजीलाल बरबटे हे सरपंच (Sarpanch) पदासाठी रिंगणात उभे ठाकले आहेत. कुंजीलाल बरबटे यांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. ही लढाई जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? 'झेंडा' या चित्रपटातील हे गाणं राज्यातील वारंवार बदलत असलेल्या राजकीय उलथापालथीवर भाष्य करणारं आहे. आयुष्यभर सतरंज्या उचलून बेजार झालेल्या राजकीय कार्यकर्त्यांची आज अशीच अवस्था आहे. कारण, वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्याच पक्षात सासू, सासरे, सुनबाई हे सर्व राजकीय मंडळी रात्री एका पक्षात असले तरी सकाळी कार्यकर्ता झोपेतून उठेपर्यंत ज्यांना आपण दैवत मानतो ते दैवत अन्य कुठल्या पक्षात जातील, हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळे गावगाड्यातील कार्यकर्ता व मतदार आता हुशार झाला आहे.

Nagpur
नागपूर विधानभवनातील शिवसेना कार्यालयावर पडदा; पुन्हा वाद होण्याची शक्यता !

गावात कोणीच कोणाविषयी वाईट बोलून वाद ओढवून घ्यायला तयार नाही. वरिष्ठ स्तरावर सर्व नेते एक असून आपण का वाईट व्हायचं, असा विचार बळावत चालला आहे. कारण ज्यांच्यासाठी आपण वाईट होतो ते वरती कधीही एका ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे गावातील संबंध खराब व्हायला नको, अशीच भूमिका कार्यकर्ता घेताना दिसून येतो. विदर्भात थंडीने जोर पकडला आहे. या कडाक्याच्या थंडीतही गावकाड्याच्या राजकारणाचा पारा मात्र चांगलाच वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com