गोंडपिपरी नगरपंचायत निवडणूक : एकाच प्रभागात सख्ख्या जावा आमनेसामने

ज्या ठिकाणी ओबीसी (OBC) आरक्षण होते, तिथे आता सर्वसाधारण गटातून निवडणुका होता आहेत. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या (Nagarpanchayat) निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होत आहे.
Nagarpanchayat Election, Gondpipari
Nagarpanchayat Election, GondpipariSarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावखेडयांतील निवडणुका म्हटल्या की लईच भारी. नगरपंचायत (Nagarpanchayat) निवडणुकीत याहून वेगळी स्थिती नाही. आपल्या होममिनीस्टरला प्रभागाच्या सत्तेची चावी मिळावी, यासाठी गोंडपिपरीत नेत्यांनी कंबर कसली आहे. सर्वसाधारण महिला गटात मोडणाऱ्या गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये सख्या जावा आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. दोंघांनीही विजयासाठी कंबर कसली आहे. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

ओेबीसीचे (OBC) राजकीय आरक्षण (OBC Reservation) स्थगित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. अन् ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षण होते, तिथे आता सर्वसाधारण गटातून निवडणुका होता आहेत. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होत आहे. तीन प्रभागात होऊ घातलेल्या निवडणुकीत दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर एक जागा पुरुष प्रवर्गाकरिता आहे. या तिन्ही प्रभागांत आता विजयासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 या महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नीलिमा दामोधर गरपल्लीवार तर अपक्ष उमेदवार शारदा खेमदेव गरपल्लीवार या उभ्या आहेत.

विशेष म्हणजे या सख्या जावा आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव गरपल्लीवार हे पंचायत समितीचे सभापती होते. त्यांचे दोन्ही चिरंजीव हे सध्या राजकारणात आहेत. दामोधर गरपल्लीवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आहेत. तर खेमचंद गरपल्लीवार हे सध्या अपक्षाच्या भूमिकेत आहेत. आपल्या पत्नीला कॉंग्रेसची तिकीट मिळावी, यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. यानंतर सोशल मिडीयातून भाजपच्या कमळाचे सिंबॉल टाकत त्यांनी शुभेच्छा संदेश टाकला व भाजपशी जुळण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही खेमचंद यांना यश मिळाले नाही, शेवटी त्यांनी आपल्या पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले.याच प्रभागातून कॉंग्रेसचे रामचंद्र कुरवटकर यांच्या पत्नी सुनिता कुरवटकर, भाजपकडून शुभांगी मनोज वनकर तर शिवसेनेकडून सोनाली सुरेंद्र मांदाडे या उभ्या आहेत. एकाच या प्रभागात सख्या जावा आमनेसामने असल्याने आता प्रचंड रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे.

Nagarpanchayat Election, Gondpipari
चंद्रपूर महानगर पालिकेत टक्केवारी, भागीदारी आणि दादागिरी...

व्यापारी उतरले मैदानात...

गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीच्या मैदानात यावेळी मोठया प्रमाणावर व्यापारी आपले नशीब अजमावीत आहेत. एच पी गॅसच्या संचालिका सविता महेंद्रसिंह चंदेल या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभाग ६ मध्ये उभ्या आहेत. सचिन चिंतावार हे किराणा दुकानदार आहेत. यावेळी कॉंग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ११ मधून उभे आहेत. तर साई मशीनरिचे संचालक अजय माडूरवार यांच्या पत्नी सारिका माडूरवार प्रभाग क्र. ६ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच प्रभागातून भाजयुमोचे कार्यकर्ते तथा स्टील भंडार दुकानदार स्वप्निल माडूरवार याच्या पत्नी प्रांजली बोनगिरवार यासुद्धा रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in