Gondia News: म्हणे कुत्रा पिसाळलाय सिद्ध करा, जखमी पोलिस कर्मचाऱ्याची सुटीसाठी फरफट !

Gondia Police On Leave Application: देय रजा मंजूर करण्यासाठी चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे, हे सिद्ध करण्याची पंचाईत.
Gondia Police
Gondia PoliceSarkarnama

Gondia District News : गोंदिया पोलिस अधिक्षक कार्यालयाचा एक विचित्र प्रताप नुकताच पहायला मिळाला आहे. एका कर्मचाऱ्याला कुत्रा चावल्याने तो जखमी झाला. चावलेला कुत्रा हा पिसाळलेला आहे, हे आधी सिद्ध करण्याचे फरमान पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधीक्षकाने सुनावले आहे.

चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे, हे आधी सिद्ध करा आणि नंतरच उपचारासाठीची देय रजा टाका, असा फतवा चक्क पोलिस अधिक्षक कार्यालयातील अधिक्षकाने एका पोलिस कर्मचाऱ्यासाठी काढला आहे. आता देय रजा मंजूर करण्यासाठी चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे, हे सिद्ध करण्याची पंचाईत त्या पीडित कर्मचाऱ्यावर आली आहे. एका पोलिस कर्मचान्याला कार्यालयीन अधीक्षकाने सुटीच्या संदर्भाने नुकतेच तसे पत्र दिले आहे. त्या पत्राची प्रत सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

जिथे कुणी साधारण माणूस जायला धजावत नाही, अशा अशा जागांवर जाऊन पोलिस कर्मचारी आपली ड्यूटी बजावत असतात. अनेकांना प्रसंगी दुखापतही होते. रात्री-बेरात्री गस्तीवर असताना मोकाट कुत्रे मागे लागतात. अनेकदा ते चावतातही. गोंदिया पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला पाच दिवसांपूर्वी कुत्रा चावला. गंभीर जखम बघता डॉक्टरांनी त्याला उपचार आणि आरामाचा सल्ला दिला. परिणामी या पोलिसाने विशेष रजेसाठी अर्ज केला.

त्याच्या अर्जाला जिल्हा पोलिस कार्यालय अधीक्षकांनी काहीसे रंजक उत्तर दिले. कर्तव्यावर असताना राज्य शासनातील एखाद्या कर्मचाऱ्याला पिसाळलेल्या कुत्र्याने दंश घेतला असेल, तर त्याला उपचारासाठी विशेष रजा देय (मंजूर) आहे. मात्र, तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही, ते या विनंती अर्जातून स्पष्ट होत नाही. म्हणून आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र पिसाळलेला कुत्रा चावल्याचे सोबत जोडलेले नाही, असे म्हणत अर्ज कार्यालय अधीक्षकांनी परत केला आहे.

Gondia Police
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

त्यामुळे आपली रजा मंजूर कशी होणार, ही बिकट समस्या निर्माण झाली आहे. तर दूसरीकडे हे विचित्र पत्र व्हायरल झाल्याने पोलिस बॉइज संघटना आक्रमक झाली असून पोलिस कर्मचारी २४ तास आपली ड्यूटी बजावत असताना सतत ते ताण तणावात जगत असतात. ड्यूटी वर असताना एखद्या वेळी त्यांना उपचाराची गरज पडली तर आपली हक्काची सुट्टी मिळविण्यासाठी अशी तारेवरची कसरत करावी लागत असेल तर हे चुकीचे असल्याचा आरोप होत आहे.

ते पत्र प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावर मजेशीर कमेंटही येऊ लागल्यां आहे. ‘कुत्रा तुम्हाला चावला तर लगेच त्याला पकडून त्याला जागेवरच विचारा...! नाही तर कुत्र्याला दवाखान्यात (Hospital) घेऊन जा. आधी त्याची तपासणी करा, तो पिसाळला आहे की नाही म्हणून, हे तपासून घ्या नंतर स्वतःचा इलाज करा. त्यानंतरच सुटीचा अर्ज सादर करा’, अशा मजेशीर कमेंट सोशल मिडियावर येऊ लागल्या आहेत.

Gondia Police
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन 'वंदे भारत' एक्सप्रेसला हिरवा झेंडा, हे खास फोटो पाहाच

एकीकडे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर (Police) आहे. मात्र पोलिसांना आपल्या हक्कासाठी हेच कागदी घोडे त्यांनाच त्रासदायक ठरत असल्याचे गोंदियातिल (Gondia) या प्रकारातून दिसत आहे. त्यामुळे गोंदियात घडलेल्या या प्रकारावर चर्चा होऊन मार्ग निघणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com