
Maharashtra-Madhya Pradesh border issue has arisen : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अद्यापही मिटलेला नाही. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा अधूनमधून गाजतो आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाप्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील आठ गावे मध्यप्रदेशात जाण्यासाठी तयार आहेत. नव्हे या मागणीसाठी लोक आक्रमक झाले आहेत.
आमगाव नगरपरिषदेअंतर्गत येणारी आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपूर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही आठ गावे मध्य प्रदेशात विलीन करा, या मागणीसाठी शेकडो महिला-पुरुषांनी काल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपूर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा या आठही गावातील लोकसंख्या जवळपास ४० हजार असून, राज्य सीमावर्ती भाग हा मध्यप्रदेश राज्याला लागून आहे.
मागील आठ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Governent) नगर पंचायत ते नगरपरिषद स्थापनेचा वाद निर्माण करून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवले आहे. त्यामुळे या गावांचा विकास आठ वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे या आठ गावांना मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) विलीन करावे, अशी मागणी गावकऱ्यांची आहे. उल्लेखनीय म्हणजे, न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे नगर परिषदेवर प्रशासक आहे. त्यामुळेही शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये पोहोचत नाहीत.
आठ गावांना मध्यप्रदेश राज्यात विलीन करून राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नगर परिषद संघर्ष समितीने केली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठविले. मोर्चात रवी क्षीरसागर, यशवंत मानकर, संजय बहेकार, उत्तम नंदेश्वर, जगदीश शर्मा, रामेश्वर श्यामकुवर, रमन डेकाटे, मुन्ना गवळी, रितेश चुटे, राजकुमार फुंडे, राजेश मेश्राम, महेश उके, अजय खेताण, व्ही. डी. मेश्राम, कमलबापू बहेकार, दिलीप टेंभरे, जगदीश चुटे, रामदास गायधने, घनश्याम मेंढे, रामकिशन शिवणकर, अशोक बोरकर, पिंकेश शेंडे, महादेव हटवार, प्रदीप कोटांगले, राजेश मेश्राम, राजेश सातनूरकर, प्रमोद शिवणकर, भोला गुप्ता, बिसराम मेश्राम, संतोष पुंडकर, राजीव फुंडे, अनिल पाऊलझगडे, ममता पाऊलझगडे, सुनंदा येरणे, प्रभा उपराडे, जयश्री पुंडकर, पुष्पलता केशरवाणी यांच्यासह शेकडो गावकरी सहभागी झाले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.