Gondia Nana Patole News : तब्बल २५ वर्षांनंतर गोंदिया-भंडारा लोकसभेवर नानांनी केला दावा !

Congress Workers : काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Gondia - Bhandara Political News : काँग्रेसने २५ वर्षांनंतर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात तीन ते १३ सप्टेंबर या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत संकल्प पदयात्रा काढण्यात आली. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. (There is a picture of Congress workers getting to work)

विशेष म्हणजे मागील महिन्यात भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी येथून उमेदवार देण्याची मागणी लावून धरत ‘तुम्ही लढा’ असा आग्रह धरला आहे.

दरम्यान, वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासमवेत आयोजित बैठकीत उमेदवारीचा प्रश्न आल्यावर त्याला बगल कशी देता येईल, याचेच डावपेच रचले गेले असले तरी सक्षम उमेदवाराअभावी काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीचा गाडा पुढे कसा जाणार, असा पेच निर्माण झाला आहे.

१९९९ पूर्वी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. केशवराव पारधी यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. चौथ्यांदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला गेला. २००४ आणि २००९च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथून विजयी झाले होते.

२०१४ आणि २०१९च्या निवडणुकांमध्ये भाजपने येथून विजय मिळवला. आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट शिंदे-भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्याने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष ठरलेला काँग्रेस पुन्हा एकदा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर आपला दावा करेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

दरम्यान, काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आधी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला. त्यामुळे संवाद यात्रेचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कले आहे. मतदारसंघासाठी पक्षश्रेष्ठी जो उमेदवार निश्चित करतील, त्याच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे उभे राहतील. उमेदवारीवरून आतापासूनच पक्षात वाद नको म्हणून वेळेवर नाव जाहीर करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड आणि भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दोन्ही जिल्ह्यांत लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदार, जातीनिहाय मतदारांची संख्या, कोणता उमेदवार सक्षम ठरू शकेल याचा संपूर्ण अभ्यास सुरू केला आहे. दरम्यान, काँग्रेसने २५ वर्षांनंतर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याने काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे.

Edited By : Atul Mehere

Nana Patole
Wadettiwar on Ajit Pawar : हे सरकार नालायक आहे, म्हणत वडेट्टीवारांचा अजित पवारांवर निशाणा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in