
Gondia Political News : कालपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची संवाद यात्रा गोंदियातून सुरू झाली. ही यात्रा गोंदियावरूरन निघून भंडारा जिल्ह्यात पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान नाना पटोले यांनी सरकारचे जनविघातक निर्णय जनतेपुढे आणत लोकांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम करीत आहेत. (Read how Patole is harassing the workers)
नानांच्या यात्रेदरम्यान त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी काल (ता. १२) पत्रकार परिषद घेत पटोले कसे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत आहेत, याचा पाढाच वाचला. एनएसयूआयचे गोंदिया जिल्हाध्यक्ष हरीष तुळसकर यांनी नानांवर गंभीर आरोप केले आहेत.
गोंदिया (Gondia) विश्रामगृहात काल आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नानांवर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पटोलेंच्या (Nana Patole) कार्यप्रणालीवर एनएसयूआय जिल्हाध्यक्षच नाराज असल्याने कॉंग्रेसच्या (Congress) गोटात विविध चर्चांना पेव फुटले आहे. आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना जुळवून न ठेवणारे नाना यात्रेतून लोकांना कसे जोडणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
हरीष तुळसकर म्हणाले, पक्षात मध्यंतरी काही वरिष्ठांनी पक्षबदल केल्यास, तेव्हा काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात गेले. पण काही निष्ठावान लोक पक्षातच राहून आपली जबाबदारी सांभाळत होते. दरम्यान, अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून नेत्यांची आयात सुरू झाली. काल परवा कॉंग्रेस पक्षात आलेले कार्यकर्ते जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत आहेत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा याला पूर्ण पाठिंबा आहे. ते जिल्ह्यात मनमानी करून कॉग्रेस पक्षाला संपवायला निघाले असल्याचा आरोप तुळसकर यांनी केला.
तुळसकर म्हणाले की, काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा समजून कार्य करीत असलेले कार्यकर्ते या नवख्यांना आज नकोसे झालेले आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. पक्षातील गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली आहे. आम्ही एखादा मोठा नेता येत असताना त्याकरिता काही कार्यक्रम घेतला तर तो आपला कार्यक्रम नाही म्हणून तिथं जायचं नाही, असे जिल्हा उपाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देतात.
या लोकांनी त्यांचे राजकीय १०-१५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काढले. अनेक पदे भूषविली. आता त्यांनी पक्ष बदलला. हे लोक त्यांच्या मूळ पक्षाशी इमानदार राहू शकले नाहीत, तर काँग्रेसचे कसे होतील, असा प्रश्नही तुळसकर यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व बाबींची लेखी व तोंडी तक्रार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन आणि राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांची दिल्लीत भेट घेऊन करणार असल्याचे तुळसकर यांनी म्हटले आहे.
त्यांच्याकडून पण न्याय न मिळाल्यास वेगळा विचार करणार असल्याचेही तुळसकर यांनी सांगितले. तुळसकरांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर कॉंग्रेसमधील खदखद बाहेर आली आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.