Nitin Gadkari News : ‘नितीन गडकरींना एवढी मते द्याकी मोजणारेही पागल झाले पाहिजेत’

आगामी निवडणुकीत गडकरी यांचा विजय सात लाख मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं चांगलं काम त्यांनी केले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : नितीन गडकरींमुळे (Nitin Gadkari) नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींनी एवढं काम केलं आहे की, त्यांना आता मतं मागावीच लागणार नाहीत. पण, राजकारणात मतं मागावी लागतात. आता आपल्या सर्वांची जबाबदारी असून गडकरी यांना सात लाखांपेक्षा जास्त न भूतो ना भविष्यती इतके मते मिळाली पाहिजेत. त्यांना मिळालेली मते मोजणाराही पागल झाला पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळली. (Give Nitin Gadkari so many votes that even the counters must go mad: Chandrashekhar Bawankule)

राष्ट्रीय महामार्ग ३५४-डीवर इंदोरा चौक-पाचपावली-अग्रसेन चौक-अशोक चौक-दिघोरी चौकपर्यंत ९९८.२७ कोटी रुपयांच्या निधीतून निर्मित होणाऱ्या ८.९ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये करण्यात आले. त्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री गडकरी, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर नेते उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
Thackeray Vs Shinde : उदय सामंतांचा गौप्यस्फोट : ठाकरे गटातील १३ आमदार आमच्या संपर्कात

ते म्हणाले की, नागपूरकरांनी नितीन गडकरी यांना दिलेले एक एक मत किती महत्वाचे आणि कामाचे आहे, हे आपल्याला गडकरी यांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे. गडकरींमुळे नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींचा एक वर्षाचा, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत उर्वरीत कामे पूर्ण होतील.

Chandrashekhar Bawankule
Solapur News : पाणीप्रश्नावर सुभाष देशमुख आक्रमक....थेट देवेंद्र फडणवीसांना लावला फोन!

नितीन गडकरी यांना आगामी निवडणुकीत मते मागण्याची गरजच पडणार नाही. जनतेने ठरवले आहे की, आगामी निवडणुकीत गडकरी यांचा विजय सात लाख मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं चांगलं काम त्यांनी केले आहे. नितीनजी, आता तुम्हाला मतं मागायची गरज भासणार नाही. पण, शेवटी राजकारणात मतं मागावी लागतात. आता आपल्या सर्वांची जबाबतदारी आहे की, गडकरी यांना सात लाखांपेक्षा जास्त न भूतो ना भविष्यती इतकी मते मिळाली पाहिजेत. गडकरी यांना इतकी मतं मिळाली पाहिजेत की मोजणारेसुद्धा पागल झाले पाहिजेत, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar Nagpur News : नागपुरात पोहोचलेल्या पवारांनी घेतली गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, नागपूरसाठी राज्य सरकारकडून १२०० कोटी आले असून ५०० कोटी पाईपलाईनमध्ये आहेत. नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २७०० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नितीनजी, तुम्हाला सर्वांनीच काहीतरी मागितले आहे. मीही त्यातून सुटणार नाही, मीही विधान परिषदेचा सदस्य आहे, त्यामुळे माझाही थोडा अधिकार आहे. नागपूर शहरातील उड्डाणपूल ज्या ठिकाणी लॅंड होतो, तो रस्ता चांगला झाला पाहिजे. रिंगरोड पडतो आऊटर रिंगरोडला पडतो. तो उड्डाणपुलापासून जर रिंगरोडला जोडला तर मोठी कनेक्टिव्हिटी मिळू शकते. त्यामुळे अमरावती, भंडाऱ्याला सहज मार्गस्थ होता येऊ शकते.

Chandrashekhar Bawankule
Junnar News : खासदार कोल्हेंची मागणी डावलून जैविविधता मानके चित्ररथ जुन्नरऐवजी बारामतीला दिला!

नागपूर शहरातील शौचालयाचे सांडपाणी कोऱ्हाटीच्या महावितरणला विकून महापालिकेला पैसे मिळवून देण्याचे काम गडकरींनी केले आहे. नागपूर शहराला आणखी ३० कोटी रुपये सांडपाणी विकून मिळणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक चांगली विभागीय आणि जिल्हाधिकारी कार्यालये बांधली आहेत. विभागातील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com