Girish Mahajan News: यवतमाळ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपी मॉडेलवर चालविणार !

Yavatmal Super Speciality Hospital: शासन या संदर्भात गांभीर्याने विचार करीत आहे.
Wajahat Mirza
Wajahat MirzaSarkarnama

MLA Dr. Wajahat Mirza Criticized Patient Care : यवतमाळ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची सुंदर इमारत बांधून पाच वर्षे झाले. हॉस्पिटल केव्हा सुरू होणार? असा थेट प्रश्न विचारत विधान परिषदेत आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी रुग्णसेवेला वाचा फोडली. यवतमाळचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पीपीपी मॉडेलवर मोठ्या कंपनीला चालविण्यास देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक मिळत नाही, हे खरे आहे. याबाबतीत उदासीनता दिसून येते. यवतमाळसह तीन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पीपीपी मॉडेलवर एखाद्या मोठ्या कंपनीला चालवायला दिले तर चांगली रुग्णसेवा देता येईल. शासन या संदर्भात गांभीर्याने विचार करीत आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी डॉ. मिर्झा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहाला सांगितले.

या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता अशा जागा भरण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागातर्फे मुलाखती घेण्यात आल्या. १०२ पैकी ९० उमेदवार मुलाखतीला आलेत. त्यापैकी केवळ ३८ जण रुजू झाले. त्यातच त्यांच्या पगारात भरघोस वाढ करण्यात आली. तरीही प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक मिळत नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात जागा रिक्त आहेत. अशी कबुली मंत्र्यांनी दिली.

मंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने आमदार (MLA) डॉ. वजाहत मिर्झा यांनी सुपर स्पेशालिटी मध्ये डीएम, कॉर्डिओलॉजिस्ट, एमएस झालेले डॉक्टर्स (Doctor) अडीच लाखाच्या वेतनावर कोठून येणार, असा प्रश्न विचारत. मी ती एमबीबीएस, एमडी डॉक्टर आहे. मला याबद्दल माहिती आहे, अशी पुष्टी जोडली. त्यांनी यासाठी सुपर स्पेशलिटीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना तीन वर्षे कंपल्सरी सेवा करण्यात आली, तरच हा प्रश्न सुटेल, असे मत मांडले.

Wajahat Mirza
Yavatmal : सरपंचांच्या पळवापळवीत आपणच नंबर वन असल्याचा दावा किती करा किती खोटा?

दोन वर्षे रुग्णसेवेचा बॉंड अनिवार्य करण्यात येईल. याबाबतीत कडक धोरण सरकार स्वीकारणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी (Girish Mahajan) सभागृहाला सांगितले. एमबीबीएस व एमडी झाल्यानंतर डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देण्यात उपलब्ध होत नाहीत. काही पालक ही सेवा टाळण्यासाठी आधी असलेली दहा लाख व नंतर पन्नास लाख रुपयांची रक्कम भरतात. आता हा निर्णय रद्द केला असून प्रत्येकालाच रुग्णसेवा अनिवार्य करण्यात आली आहे, ही बाब त्यांनी स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in