राज ठाकरेंचे समर्थन घेणे भाजपला महागात पडेल…

रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा रिपाइं पक्ष सोबत असताना भाजपला काळजी करण्याची गरज नाही.
Ramdas Athavale and Raj Thackeray
Ramdas Athavale and Raj ThackeraySarkarnama

भंडारा : भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊच शकत नाही. रिपाइं पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही, असे सांगत राज ठाकरे यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपला महागात पडेल, असा इशारा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिला आहे.

गोंदियात (Gondia) एका कार्यक्रमात आले असताना ते बोलत होते. आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना मानणारा रिपाइं पक्ष सोबत असताना भाजपला काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे भाजपने राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भानगडीत पडू नये. रिपाइं राज ठाकरेंना समर्थन करीत नाही. तसेही त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून देशात धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शांत महाराष्ट्राला अशांत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील संयमी जनता हाणून पाडेल.

राज ठाकरेंची भाषा गुंडगिरीची..

मशिदींवर वरील भोंगे हटविणे असंवैधानिक असून राज ठाकरे यांची भाषा गुंडगिरीची आहे. आपला रिपाइं पक्ष राज ठाकरे यांना समर्थन करीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र मंदिरांत भोंगे लावा आणि मशिदींवरील भोंगे हटवा, असे त्यांचे म्हणणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या विरुद्ध आहे. संविधानाने सर्वांना सर्व धर्म समभाव चा नारा दिला आहे. जर राज ठाकरे असेच संविधानविरोधी वक्तव्य करत दादागिरी करीत राहिले, तर रिपाइं आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर देईल, असेही आठवले म्हणाले.

Ramdas Athavale and Raj Thackeray
रामदास आठवले म्हणाले, कोल्हेंनी माझ्या लग्नात लाडू वाटले होते...

आतापर्यंत अयोध्या का आठवली नाही..

राज ठाकरे यांनी खुशाल अयोध्येला जावे. मात्र त्यांना आतापर्यंत अयोध्या का आठविली नाही, असा खोचक टोला खासदार रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला. मनसेने रित्या हातांनी अयोध्येला जाऊ नये, तर राम मंदिर बांधण्यास हातभार लागेल, असे काहीतरी सोबत घेऊन जावे, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com