
Chandrapur and Wani Crime News : चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रांत, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामीण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले आहे. यातून टोळ्या-टोळ्यांच्या माध्यमातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. (There has been an increase in serious crimes)
या क्षेत्रात गँगवार, खुनीसंघर्ष व हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ड्रोनद्वारे निगरानी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणीदरम्यान दिले.
मागासवर्गीय नागरिक तसेच ग्रामीण क्षेत्रातील प्रकल्प पीडितांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी २५ ऑगस्टला क्षेत्रीय कार्यालय वेकोलि घुग्गुस येथे सुनावणी घेत या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोज कुमार, चंद्रपूरच्या (Chandrapur) अतिरीक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, यवतमाळचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, वेकोलिचे मुख्य सुरक्षा अधिकारी कमांडंट विक्रांत, वेकोलि वणीचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभाषचंद्र सिंह, वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक संजय वैरागडे, वणी (Wani) नॉर्थ क्षेत्राचे श्रीवास्तव, माजरी क्षेत्राचे इलियाज हुसैन यांची उपस्थिती होती.
सदर सुनावणीत अहीर यांनी वाढत्या गुन्हेगारीला वेकोलि (WCL) प्रबंधनास जबाबदार ठरवित या गुन्हेगारीच्या उच्चाटनाकरीता अंतर्गत व परिसरातील सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक व सुसज्ज ठेवण्याची सूचना केली. पेट्रोलिंग व शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करीत स्थानिक पोलिस (Police) विभागाशी समन्वय व संपर्क प्रस्थापित करीत त्यांच्या सहकार्याने वेकोलि क्षेत्रांतील चोऱ्या व गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचे निर्देश दिले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.