गणपती बाप्पा मोरया... सोबत पुन्हा घुमणार ‘पन्नास खोके.. एकदम ओके...’चा आवाज !

शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. बंडखोर आमदारांनी गुवाहाटी व्हाया गुजरात असा प्रवास केला.
Shivsena
ShivsenaSarkarnama

चंद्रपूर : आसाममधील गुवाहाटीपासून सुरु झालेल्या ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा विधीमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत पोहचल्या. आता उद्या शुक्रवारी गणेशाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत राज्यातील सत्तांतराचे प्रतिबिंब उमटणार आहे. खास गणेश भक्तांसाठी 'पन्नास खोके एकमद ओके'च्या टि-शर्ट बाजारात विकायला आल्या आहेत. काही उत्साही गणेश भक्तांनी विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच या टी-शर्ट घालून माध्यमांवर आपल्या छायाचित्रांचे लोकार्पणसुद्धा केले आहे.

शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Governmnt) कोसळले. बंडखोर आमदारांनी गुवाहाटी व्हाया गुजरात असा प्रवास केला. गुवाहाटीत बराच काळ तळ ठोकला. तेव्हापासून पन्नास खोके़... एकमद ओकेची चर्चा सुरु झाली. हा वाक्यप्रचार राजकीय वर्तुळासोबतच समाजात आणि समाज माध्यमांतसुद्धा चांगलाच चर्चेला आला. एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) नेतृत्वात राज्यात नवे सरकार स्थापन झाले. त्यानंतर विरोधकांनी विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात ‘पन्नास खोके....एकदम ओके...’ च्या घोषणा देत सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले.

यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये झोंबाझोंबी सुद्धा झाली. ही घोषणा सत्ताधाऱ्यांना चांगलीच जिव्हारी लागली. त्यानंतर झालेल्या दही हंडी, पोळा, मारबत मिरवणुकीतसुद्धा ही घोषणा लोकप्रिय ठरली. आता गणेशोत्सवातदेखील सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी याचा वापर केला जात आहे. आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी असताना सांगोल्याचे आमदार शाहजी बापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल.. सार ओके मंधी..’ हे वाक्य चांगलेच चर्चेत आले. समाज माध्यमांत तर बरेच दिवस याचीच चर्चा होती. पाटील यांच्या या वक्तव्याचा आधार सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी विरोधक घेत आहेत.

Shivsena
Maha vikas aaghadi : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता : कॉंग्रेस काय करणार ?

उद्या गणेश विसर्जन होईल. राज्यातील अनेक शहरांत विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत देखावे सादर करण्याची परंपरा आहे. याच देखाव्यात पन्नास खोके, एकदम ओकेच्या टी-शर्ट घातलेली मंडळी बघायला मिळेल. या वाक्यप्रचारालाच सध्या चांगलाच भाव आला आहे. त्यामुळे कपडा विक्रेत्यांनीसुद्धा ही संधी सोडली नाही. पन्नास खोके-एकदम ओके लिहिलेल्या टी-शर्ट बाजारात विकायला आणल्या आहेत. केवळ चंद्रपूर शहरातच नव्हे तर तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा त्या उपलब्ध झाल्या आहेत. अनेकांनी त्या घालून समाज माध्यमांवर आपले छायाचित्र सुद्धा टाकले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया. सोबतच पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा उद्या ऐकायला मिळणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com