Karnatakaच्या हुबळी येथून आला होता गडकरींच्या कार्यालयात धमकीचा कॉल !

100 crore demand : धमकी देणाऱ्याने १०० कोटीं रुपयांची मागणीही केली असल्याचीही माहिती आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Nitin Gadkari News : केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी नागपुरातील (Nagpur) खामला चौकातील कार्यालयात सकाळी ११.३० वाजता दोन कॉल आणि १२ वाजताच्या सुमारास एक कॉल करून दाऊद इब्राहिम याच्या नावाने धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने १०० कोटीं रुपयांची मागणीही केली असल्याचीही माहिती आहे.

खामला येथील ऑरेंज सीटी हॉस्पिटलसमोर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. आज सकाळी कार्यालयात त्यांचे अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना कॉल आला. या कॉलवरून दाऊद इब्राहिम (Daud Ibrhahim) याच्याकडून बोलत असून १०० कोटी रुपये न दिल्यास नितीन गडकरी यांना जिवानिशी मारण्यात येईल, असे सांगण्यात आले. जीव वाचवायचा असल्यास तत्काळ पैशांची व्यवस्था करावी, असे सांगण्यात आले.

नितीन गडकरींच्या कार्यालयाकडून ही माहिती पोलिसांना (Police) देताच त्यांनी कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) आलेल्या धमकीच्या कॉलची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टिमनेही तपास सुरू केला आहे. कर्नाटकच्या हुबळी येथून धमकीचा कॉल आल्याची माहिती आहे. दाऊद इब्राहिम याच्या नावाचा वापर कॉल करणाऱ्याने केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : सांस्कृतिक मंत्री नसूनही सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य करत आहेत नितीन गडकरी...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपुरात आहेत. ते नागपुरात असताना त्यांच्या कार्यालयात जीवे मारण्याच्या धमकीचा फोन येणे हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण पोलिस आणि दहशतवादी विरोधी पथकाने गांभीर्याने घेतले आहे. कर्नाटकच्या हुबळी येथून तो कॉल आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दिशेने तपास सुरू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com