गडकरी म्हणाले, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सच्चिदानंदजी कायम स्मरणात राहतील...

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सच्चिदानंदजी कायम स्मरणात राहतील, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी डॉ. सच्चिदानंद यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गडकरी म्हणाले, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सच्चिदानंदजी कायम स्मरणात राहतील...
Nitin Gadkari on Dr. Sacchidanand Mungantiwar's deathSarkarnama

नागपूर : माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक झाला आहे. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे आज नागपूरमध्ये निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धहस्त डॉक्टर, संवेदनशील समाजसेवक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सच्चिदानंदजी कायम स्मरणात राहतील, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी डॉ. सच्चिदानंद यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्यानंतर डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्यावर नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात सुरू होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूक होती. आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होतं. याशिवाय त्यांच्या पश्चात मुलगी- जावई व मोठा आप्तपरिवार आहे.

याशिवाय डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी १९६७ मध्‍ये भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूरमधून (Chandrapur) विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. वयाच्या उत्तरार्धात देखील संघाशी निगडित शेकडो सेवाकार्यासाठी त्यांनी सतत प्रवास केला. त्‍यांचे पार्थिव शनिवार, ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यानंतर सायंकाळी ४.३० वाजता कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून अंत्‍ययात्रा निघेल आणि शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

शोकसंदेशात गडकरी म्हणाले, ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सिद्धहस्त डॉक्टर, संवेदनशील समाजसेवक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सच्चिदानंदजी कायम स्मरणात राहतील. सच्चिदानंदजी यांच्याशी माझे अतिशय जवळचे पारिवारिक संबंध होते. त्यांच्या निधनाने माझी व्यक्तिगत हानी झाली आहे. ईश्वर सुधीरभाऊ आणि संपूर्ण मुनगंटीवार परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती.’

ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : आमदार किशोर जोरगेवार

डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. डॉक्टरी पेशात असलेल्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी रुग्णसेवा केली. सोबतच सामाजिक प्रश्नांवरही त्यांचे विचार हे दखलपात्र असायचे. प्रसिद्धीपासून दूर राहत त्यांनी समाजासाठी केलेले कार्य हे आजीवन स्मरणात राहणार आहे. ते अनेकांचे मार्गदर्शक होते. अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते त्यांचा आशीर्वाद घेऊन मोठे झाले. त्यांच्या जाण्याने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व कायमचे हरवले आहे. अशी शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

साधे राहणीमान आणि स्पष्ट बोलण्याचा त्यांच्या स्वभावामुळे ते नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार होते. त्यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक म्हणुनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी त्यावेळी संघाचा विस्तार चंद्रपूरात केला. अनेकदा त्यांची भेट होत असे. समाजहिताप्रति त्यांच्यात असलेली तळमळ त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायची. ते स्वत:च रुग्णालय चालवत असताना अगदी नाममात्र फी घेत एक प्रकारे रुग्णांची सेवा करायचे. त्यांच्या जाण्याने समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने कसलाही गर्व न बाळगता वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करणा-या व्यक्तिमत्त्वास आज समाज मुकला असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.

Nitin Gadkari on Dr. Sacchidanand Mungantiwar's death
असे दृढ झाले आमदार सुधीर मुनगंटीवार आणि गुरुकुंज मोझरीचे नाते…

माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा विविध जबाबदा-या त्‍यांनी समर्थपणे सांभाळल्‍या. १९६७ मध्‍ये त्‍यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचा चंद्रपूर जिल्ह्यात विस्तार करण्यात त्यांच्या सिंहाचा वाटा आहे. आपले आदर्श आणि मार्गदर्शक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

- खासदार सुनील मेंढे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपुरातील प्रसिद्ध डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे नागपुरात निधन झाले. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ, तर नेत्रतज्ज्ञ डॉ. संदीप हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होत. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो. ॐ शांती.

- आमदार चंद्रशेखर बावनकुळे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in