गडकरी स्वतःही स्वस्थ बसत नाही, अन् कुणाला बसूही देत नाहीत…

राज्य सरकारकडून या कामात कुठलीही अडचण येणार नाही, तर प्रत्येक आघाडीवर मदतच होईल, अशी हमी सुनील केदार Minister Sunil Kedar यांनी दिली.
Nitin Gadkari and Sunil Kedar
Nitin Gadkari and Sunil KedarSarkarnama

नागपूर : भन्नाट कल्पनाशक्ती आणि स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याची जिद्द यांमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात अफाट कामे केली आहेत. ते स्वतःही स्वस्थ बसत नाहीत आणि कुणाला बसूही देत नाही, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य़ आहे, असे राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले.

वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क साकारला जातोय. त्याकरिता जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि एनएचएआय (नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया) यांच्यात गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये काल करार झाला. यावेळी ते बोलत होते. हे काम मी पालकमंत्री असलेल्या वर्धा जिल्ह्यात असल्याने ते आता मलाही स्वस्थ बसू देणार नाहीत, असे केदार म्हणाले. केदारांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हंशा पिकला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार पंकज भोयर, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांच्यासह लॉजिस्टिकचे संचालक सत्यनाथन आणि प्रकाश गौर उपस्थित होते. केदार म्हणाले, गडकरी यांनी आजपर्यंत सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य केले आहे. त्यांच्या प्रत्येक कामाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस असतो.

एनएचएआयचे इंजिन अन् गडकरींचे इंधन..

स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात साकार करणे, ही किमया प्रत्येकाला जमत नाही. पण गडकरींनी ही किमया साध्य केली आहे. एनएचएआयचे इंजिन गडकरींच्या इंधनामुळेच आस सुसाट निघाले आहे. वर्धा जिल्ह्यातील ड्राटपोर्ट, मिहान आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रामुळे येत्या काही वर्षांत नागपूर शहर देशाचे लॉजिस्टिक हब होणार असल्याचा जो दावा त्यांनी, तो निश्‍चितच खरा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चे काही करणे शक्य असेल, ते मी करणार आहे. राज्य सरकारकडून या कामात कुठलीही अडचण येणार नाही, तर प्रत्येक आघाडीवर मदतच होईल, अशी हमी सुनील केदार यांनी दिली.

Nitin Gadkari and Sunil Kedar
पूजाच्या पेंटींग भारावले मंत्री सुनील केदार, म्हणाले अद्भूत कलाकृती...

लोककल्याणकारी कामांची शिकवण..

नितीन गडकरी देशातील ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात वावरणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी लोककल्याणकारी कामे करण्याची शिकवण दिली आहे. माझ्या मतदारसंघात असलेले कोच्ची धरण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातही येते. त्या धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला आणि झपाटल्यागत काम केले होते, हे मला आजही आठवते. तेव्हापासून त्यांच्याप्रमाणे कामे करण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वसामान्यांना चांगले दिवस दाखवण्यासाठी गडकरी नेहमी प्रयत्नरत असतात. वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे साकारण्यात येत असलेला लॉजिस्टीक पार्क, हा देखील त्यातलाच एक प्रयत्न आहे, असे मंत्री सुनील केदार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com