नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश ; स्फोटक साहित्य जप्त

भंगारामपेठा येथील रहिवासी असलेला एक आरोपी छोटु मुल्ला गावडे फरार आहे.
नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश ; स्फोटक साहित्य जप्त
sarkarnama

गडचिरोली : तेलंगणा राज्यातून दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे वाहतुक करीत असलेल्या ४ व्यक्तींकडून ३५०० मीटर लांबीचे 10 नग कार्डेक्स वायरचे बंडल व अन्य नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील दामरंचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा भंगारामपेठा गावात दामरंचा पोलिस जवान (gadchiroli police)व शिघ्र कृती दल दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांना हे यश मिळाले.

यातील ४ आरोपींना घटनास्थळावरुन पकडण्यात आले. मौजा भंगारामपेठा येथील रहिवासी असलेला एक आरोपी छोटु मुल्ला गावडे फरार आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलिस दलाकडून कसून तपास करण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरचा नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड,  बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो.

आरोपींमध्ये राजू गोपाल सल्ला (वय 31 वर्षे रा. आसिफनगर, एनटीआर कॉलनी, जि. करीमनगर), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय 24 वर्षे रा. भंगारामपेठा ता. अहेरी, साधु लच्चा तलांडी (वय 30 वर्षे), मोहम्मद कासिम शादुल्ला (रा . एनटीआर तामिल कॉलनी, बाबुपेठ, आसिफनगर तेलंगणा), छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे रा. भंगाराम पेठा ता. अहेरी यांचा समावेश आहे.

नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश ; स्फोटक साहित्य जप्त
मनसेचं 'मराठी कार्ड' ; राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना सूचना

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. (gadchiroli police arrested gang who have been supported naxal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com