G-20 : उद्या येणार विदेशी पाहुणे; काही रस्त्यांवर मातीचे ढिगारे, इतरही कामे सुरूच...

NMC : महिनाभरापासून शहर सौंदर्यीकरणाची तसेच रस्त्यांची कामे सुरू आहे.
Nagpur
NagpurSarkarnama

Nagpur G-20 Guest News : जी-२० आंतरराष्ट्रीय बैठकीनिमित्त विदेशी पाहुणे उद्या नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहराची सजावट करण्यात येत असून रस्ते बांधकाम, फुटपाथ व हिरवळीची कामे अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पसारा पडला आहे. दोन दिवसांवर बैठक असल्याने परिसराची स्वच्छता कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (When will the area be cleaned?)

नागपूरकरांतही या परिषदेची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी शहराचे रुपच पालटले आहे. गेल्या महिनाभरापासून शहर सौंदर्यीकरणाची तसेच रस्त्यांची कामे सुरू आहे. दोन दिवसांनी पाहुणे शहरात येणार आहे. अद्यापही वर्धा मार्गावरील कामे सुरू आहे.

अजनी चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक भागात झाडे लावण्यात येत आहे. रस्‍त्याच्या दोन्ही बाजूला लॉन गवत लावण्यात येत आहे. माती, सिमेंट, गिट्‍टी रस्त्यावर पडली आहे. रविवारी पाहुणे शहरात येणार असल्याने रस्त्यांची स्वच्छता अग्रक्रमांकावर राहणार आहे.

अद्याप हिरवळ, रस्त्यांची कामे सुरू असल्याने महापालिका रस्ते, परिसर कसे स्वच्छ करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे दुभाजकांवर झाडे लावताना मातीचा वापर केला जात आहे. ही माती दुभाजकांवर पडत असल्याने रंगरंगोटीची कामेही खोळंबली आहे.

Nagpur
Nagpur : देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री असल्याचा नागपूरला झाला ‘हा’ मोठा फायदा !

पालिकेपुढे मोठे आव्हान..

अनेक दुभाजकांची अद्यापही रंगरंगोटी झाली नसल्याने विदेशी पाहुण्यांपुढे तोंडघशी पडण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील (Nagpur) विविध चौकांमध्ये नागपूर शहराची संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे आकर्षक देखावे साकारण्यात आलेले आहेत. सर्वत्र आकर्षक रोषणाई करण्यात आली.

रस्ते किंवा बैठकीचा परिसर स्वच्छ करण्यासाठी कधी सुरुवात केली जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बांधकाम, हिरवळीची कामे सुरू राहिल्यास स्वच्छतेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता बळावली आहे. एका दिवसांत रस्ते, परिसर स्वच्छतेचे मोठे आव्हान महापालिकेपुढे (Municipal Corporation) उभे ठाकले आहे.

उद्यान विभागाकडून केली जाणारी हिरवळीची कामे अंतिम टप्प्यात आहे. विमानतळ (Nagpur Airport) परिसरातील हिरवळीची कामे पूर्ण झाली आहे. काही ठिकाणची कामे आजच पूर्ण होतील. काही ठिकाणी शेवटचा हात फिरवणे सुरू आहे.

- अमोल चौरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in