Fuke on Wadettiwar, Patole : मीडियात कोण जास्त वेळ येणार? वडेट्टीवार-पटोलेंमध्ये लागली स्पर्धा; फुकेंचा हल्लाबोल !

Dr. Parinay Fuke : वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला?
Nana Patole, Dr. Parinay Fuke and Vijay Wadettiwar
Nana Patole, Dr. Parinay Fuke and Vijay WadettiwarSarkarnama

Bhandara - Gondia Districts Political News : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा ओबीसी नेते डॉ. परिणय फुके हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलेच संतापलेले दिसले. यापूर्वीही ‘विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासण्याची वेळ आली आहे’, असे त्यांनी म्हटलेले आहे. आज (ता. नऊ) विजय वडेट्टीवार दोन समाजांत तेढ निर्माण करत आहेत, असा घणाघात डॉ. फुकेंनी केला. (Who gave Vadettiwar the right to advocate for the OBC community?)

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीचे समर्थन केले होते. त्यावर डॉ. फुके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासण्याची वेळ आल्याचे फुके यापूर्वी बोलले आहेत. दरम्यान वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला, असा परखड सवाल फुकेंनी केला आहे. वडेट्टीवार यांनी वेळीच आपली भूमिका न बदल्यास त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. फुके यांनी दिला आहे. ते आज (ता. नऊ) भंडारा शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालन्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे ठाम असल्याने विविध पक्षांकडून राजकीय मते व सल्ले त्यांना येऊ लागले आहेत. दरम्यान जालना येथे मराठा नेते जरांगे यांच्या भेटीला गेलेल्या विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर परिणय फुके चिडलेले आहेत.

Nana Patole, Dr. Parinay Fuke and Vijay Wadettiwar
Bhandara-Gondia News : ‘सारस’ करणार अवैध धंद्यांची पोलखोल, मुनगंटीवारांच्या ट्विटनंतर सुरू झाली चर्चा !

वडेट्टीवारांच्या (Vijay Wadettiwar) वक्तव्यामुळे त्यांच्याबद्दल ओबीसी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यात ओबीसी नेते डॉ. परिणय फुकेसुद्धा (Dr. Parinay Fuke) मागे राहिले नसून भंडाऱ्यात (Bhandara) आल्यावर त्यांनी परखड शब्दात वडेट्टीवार यांचा समाचार घेतला. विजय वडेट्टीवार ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडीच वर्षे मंत्री होते, तेव्हा समाजाला त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. त्यांनी ओबीसी समाजासाठी एकही ठोस निर्णय घेतला नाही.

कोणतीही योजना आणली नाही. वडेट्टीवार खरंच महाराष्ट्राचे आणि खरोखर ओबीसी आहेत का, हे तपासावं लागणार आहे. मात्र एका वकिलाप्रमाणे ओबीसी आरक्षणात मराठ्यांना समाविष्ट करण्याचा सल्ला देण्याचा त्यांना अधिकार काय, असाही सवाल फुके यांनी केला. यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावण्याची कुणातही नाही, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे वडेट्टीवारांना इशाराच दिला आहे.

Nana Patole, Dr. Parinay Fuke and Vijay Wadettiwar
Bhandara Political Climate News : पावसांच्या सरींनी वातावरणात गारवा, पण नेत्यांच्या यात्रांनी तापू लागले राजकीय वातावरण !

परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचाही समाचार घेतला. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांचे आपसात पटत नाही. त्यामुळे मीडियावर कोण जास्त वेळ येणार, याची स्पर्धा त्यांच्यात लागली आहे, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्याचाही समाचार फुकेंनी घेतला.

वडेट्टीवार आणि पटोले महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याच काम करत आहेत. आधीच ओबीसी आरक्षणात अनेक जातींचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसींचा विकासच अजून पूर्णतः झाला नाही. त्यात अजून मराठा समाजाची भर पडणे चुकीचे होईल. असे आम्ही होऊ देणार नाही, असेही डॉ. परिणय फुके म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in