शिवसेना नगरसेवकांसह आजी-माजी पदाधिकारी मुंबईत, शिंदे गटात जाणार !

या सर्वांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. हा प्रवेश झाल्यास अकोला (Akola) जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.
Akola's shivsainiks are on the way of Eknath Shinde Group.
Akola's shivsainiks are on the way of Eknath Shinde Group.Sarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेसमोर एक ना अनेक आव्हाने उभी ठाकली आहे. आदित्य ठाकरे संघटनासाठी दौऱ्यावर असतानासुद्धा दररोज कुठले ना कुठले नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटामध्ये जात आहेत. आज विदर्भाच्या अकोल्यातील शिवसेनेचे आजी माजी २५ कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. हे सर्व जण शिंदे गटात प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे.

आज मुंबईत (Mumbai) दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपशहर प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, दोन नगरसेवकांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज भेट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. हा प्रवेश झाल्यास अकोला (Akola) जिल्ह्यात शिवसेनेला (Shivsena) मोठे खिंडार पडणार आहे. अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेतही गटबाजी कमी नाही. जिल्हाप्रमुख (District Chief) तथा आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया, माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे गट असल्याची चर्चा नेहमीच रंगते.

राज्यात नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाकडून अकोल्यातही गट वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आज शिवसेनेचे काही पदाधिकारी मुंबईत दाखल झाले असून, ते शिंदे गटात सहभागी होण्याच्या अनुषंगाने हालचाली करीत असल्याचे समजते. हे २५ जण अकोला जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी आहे. यामुळे शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जाते.

अकोला जिल्ह्यातील शिवसेनेत असलेल्या दोन गटांचा शिंदे समर्थकांना फायदाच झाला आहे. जिल्हा प्रमुख नितीन देशमुख व गोपाल दातकर यांचा एक गट तर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा एक गट जिल्ह्यात आहे. या मतभेदाचा फायदा शिंदे गटाने घेत बाजोरिया यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. १८ जुलै रोजी मुंबईत झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीला बाजोरिया यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत या बैठकीला अकोला जिल्हा युवा सेना प्रमुख विठ्ठल सरप यांचीही उपस्‍थिती होती. ही बाब युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांच्या पर्यंत पोहोचली. त्यांनी तातडीने पावले उचलत अकोला जिल्हा युवा सेना पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले होते.

Akola's shivsainiks are on the way of Eknath Shinde Group.
एकनाथ शिंदे विसरले पण श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंचे पद लक्षात ठेवले...

जिल्ह्याचा घेतला आढावा

अकोला जिल्हा युवा सेनेचे जिल्हा प्रमुखच शिंदे गटाशी जवळीक साधून असल्याची माहिती मिळाल्यानंतर युवा सेनेचे सचिव वरून देसाई यांनी जिल्ह्यातील युवा सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यांच्याकडून जिल्ह्यातील युवा सेनेचा आढावा घेतला. जिल्हा युवा सेना प्रमुखांसह जिल्ह्यातील युवा सेनेत लवकरच बदल झालेले दिसतील, असे संकेत त्यांनी दिले असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com