Moreshwar Temurde : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे झोपेतच हृदयविकाराने निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील निकटवर्तीय म्हणून ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांची ओळख होती.
Moreshwar Temurde
Moreshwar TemurdeSarkarnama

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते तथा वरोराचे माजी आमदार ॲड. मोरेश्वर टेमुर्डे (Adv. Moreshwar Temurde) यांचे राहत्या घरी झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ॲड. टेमुर्डे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. (Former MLA Adv. Moreshwar Temurde passed away due to heart disease)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील निकटवर्तीय म्हणून ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्ह्यातील उभारणीत टेमुर्डे यांचा मोठा वाटा होता. सडतोड बोलणाऱ्यापैकी ॲड. टेमुर्डे हे हेाते. टेमुर्डे कुटुंबावर त्यांच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Moreshwar Temurde
Sangli News : एवढे पैसे कोठून आणले म्हणून इन्कम टॅक्स तुमचीच चौकशी करेल : फसवणूक झालेल्या महिलांना नेत्याची दमबाजी

दरम्यान, मोरेश्वर टेमुर्डे यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. ते १९९१ ते १९९५ आणि १९९५ ते २००० असे दोन वेळा आमदार हेाते. त्यांनी या दोन्ही निवडणुका शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून लढली होती. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

Moreshwar Temurde
Vasantdada Sugar Institute Sabha : ९०० हार्वेस्टर घेण्यासाठी सरकार मदत करणार ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

टेमुर्डे यांनी १९९१ ते १९९५ च्या दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. राजकीय परिस्थितीवर पोटतिडकीने बोलणारे टेमुर्डे यांना सामाजिक भान होते. त्यामुळे ते राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही पुढे असायचे. माजी आमदार टेमुर्डे यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला दान करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in