नातवांचा हट्ट पुरवण्यासाठी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे पुन्हा चढले बोहल्यावर...

अकोल्यातील(Akola) एक अनोखा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यात तोच नवरा अन् तीच नवरी.. आणि विवाहाचा थाटही तोच.. बँड बाजा बारात.. मात्र ही गोष्ट आहे, पुन्हा एकदा झालेल्या विवाह सोहळ्याची
नातवांचा हट्ट पुरवण्यासाठी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे पुन्हा चढले बोहल्यावर...
Gulabrao Gawande in AkolaSarkarnama

अकोला : असे म्हणतात की, आयुष्यात लग्न एकदाच होतं.. मात्र याला अपवाद आहे, अकोल्यातील (Akola) एक अनोखा विवाह सोहळा. कारण या विवाह सोहळ्यात तोच नवरा अन् तीच नवरी.. आणि विवाहाचा थाटही तोच.. बँड बाजा बारात.. मात्र ही गोष्ट आहे, पुन्हा एकदा झालेल्या विवाह सोहळ्याची आणि हा विवाह सोहळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचा...

झालं असं की, 11 मे हा गुलाबराव गावंडे (Gulabrao Gawande) आणि आशा गावंडे यांच्या लग्नाचा वाढदिवस. यावर्षी लग्नाच्या 41 व्या वाढदिवशी आजोबांचा शाही विवाह आम्हालाही बघायचा आहे. असा हट्ट गुलाबराव गावंडे यांच्या नातवांनी केला. मग काय नातवांचा बालहट्ट म्हटल्यावर आजोबाही बोहल्यावर चढण्यासाठी तयार झाले. गुलाबराव गावंडे यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आणि युवराज गावंडे यांनीही या शाही लग्नाची शाही तयारीही केली. पत्रिका ही छापण्यात आल्या. बँड बाजा बारातची व्यवस्था ही करण्यात आली.

पुन्हा झालेल्या या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लग्नाला सर्व आप्तस्वकीयांनाही बोलावण्यात आले. पुन्हा जुन्या स्मृर्तीना उजाळा देऊन पुन्हा एकदा त्यांच्या तशाच विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मुलांना, नातवंडांना आजी-आजोबांचा 'हृदयी वसंत फुलतांना' बघता आला. सायंकाळी कौलखेड परिसरातील फार्मसी महाविद्यालयात हा विवाह सोहळा थाटात पार पडला. आजोबा गुलाबराव गावंडे आणि आजी आशा गावंडे यांचा लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा शाही विवाह सोहळा पार पडला.

Gulabrao Gawande in Akola
शरद पवार यांच्याबाबत बाळासाहेब आंबेडकर जे काही बोलले ते खोटे : गुलाबराव गावंडे

ऋतुराज गावंडे, देवराज बाळराजे सावंत, अधिराज गावंडे, वेदांत कोहळे, शौर्या सावंत, देवराज गावंडे आणि सिद्धांत कोहळे या नातवांनी आजी आजोबांचा विवाह सोहळा याची देही याची डोळा बघितला. जेवणात पुरण पोळीच्या पंगती उठल्या. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला भाजप आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार दाळू गुरुजी, माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार भैय्यासाहेब तिडके, सुभाष कोरपे यांच्या सह सर्वच पक्षांतील राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी, यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यामुळे या अनोख्या विवाह सोहळ्याची अकोल्यात चांगलीच चर्चा रंगली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.